शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

वीजबिलांचा घोळ कायम , गैरहजर अधिका-यांचा ग्राहकांना त्रास , अडचणी वाढल्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:38 IST

कडूस येथील महावितरणच्या गलथान कारभाराने वीजग्राहक अक्षरश: वैतागले आहेत. कडूस येथे महावितरणचे वरिष्ठ अभियंता कार्यालय आहे. परंतु कार्यालयीन कामकाज करण्यासाठी अभियंता कार्यालयीन कामकाज करण्यासाठी दहा वाजता येण्याची गरज असताना

चासकमान : कडूस येथील महावितरणच्या गलथान कारभाराने वीजग्राहक अक्षरश: वैतागले आहेत. कडूस येथे महावितरणचे वरिष्ठ अभियंता कार्यालय आहे. परंतु कार्यालयीन कामकाज करण्यासाठी अभियंता कार्यालयीन कामकाज करण्यासाठी दहा वाजता येण्याची गरज असताना अधिकारी मात्र बारा वाजून गेले तरी येत नसल्यामुळे वीज ग्राहकांना अधिकाºयांची वाट पाहात ताटकळत बसावे लागत असल्याने कार्यालय असून नसल्यासारखे आहे.खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कडूस ही मुख्य बाजारपेठ आहे. याच ठिकाणी महावितरणे वरिष्ठ कार्यालय आहे. परंतु कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच रीडिंग न घेता तब्बल ४० हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंतची विजेची बिले सर्रास दिली जात आहेत. बिलवाटप तर एखाद्या महावितरणच्या कार्यालयातील पिंपावर ठेवले जात असून ते ग्राहकालाच शोधून घेऊन जावे लागत आहे. जनतेच्या अडचणी सोडविण्यास अधिकारी वर्ग सपशेल अपयशी ठरला आहे. विजबिले वेळेवर मिळत नसल्याने विजबिले भरमसाठ एकदम येत आहे. ती कमी करण्यासाठी ग्राहकांची कुचंबना होत आहे व त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्यामुळे येथील वीज बिल वाटण्यासाठी वायरमन नेमावा अन्यथा: आंदोलन करण्याचा इशारा विविध गावांच्या ग्रामस्थांनीदिला आहे.परिसरातील अनेक गावांना वीजबिल वाटप करणारे वायरमन सर्रास कामचुकारपणा करत असल्याने त्याचा नाहक भूर्दंड ग्राहकांना बसत आहे. विजेचा ट्रान्सफॉर्मर बिघडला तर मात्र वायरमन मिळत नाही. त्यामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय ही तर नेहमीचीच बाब असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. वरिष्ठांकडे अनेक वेळा तक्रार करूनही बिलकूल दखल घेतली जात नसल्याचा आरोप संतप्त नागरिक करत आहेत.कडूस हे पश्चिम भागातील मोठी बाजारपेठ असल्यामुळे येथे महावितरणचे वरिष्ठ कार्यालय असल्यामुळे येथून कडूस, चासकमान धरण, कहू, कोयाळी, साबुर्डी, वेताळे, सायगाव, वाशेरे, वाजवणे, औदर, कोहिंडे सह पश्चिम भागातील आदिवासी भागात विजेचा पुरवठा हा कडूसमधून केला जातो. यामुळे कडूस महावितरण कार्यालयात बरेसचे वीजग्राहक हे विजेची भरमसाठ येणारी बिले कमी करण्यासाठीच येतात. परंतु महावितरणचे कर्मचारी नीट उत्तरे न देता अरेवारीची भाषा करत असल्यामुळे नागरिक अत्यंत संताप व्यक्त करत आहे.फ्यूजपेट्या धुळखातमहावितरणच्या कार्यालयातच वापराविना फ्यूज पेट्या, डीपी, वायर, बोर्ड वापराविना धुळखात पडून आहे. परिसरातील नागरिकांच्या शेतात असणाºया डीपीमधील वायरी जळत असतात; परंतु ते लवकर बसविले जात नाही. परंतु महावितरणच्या कार्यालयात साहित्य असूनही वापराविना धुळखात पडून आहे.तसेच महावितरणच्या कार्यालयात मोठमोठी झाडेझुडपे वाढली आहेत. तसेच याच कार्यालयात गवत, पडलेल्या विटा पडलेला कचºयाचा खच यामुळे कार्यालयात येणाºया ग्राहकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.महावितरणच्या कार्यालयाचे ओफिर पॉवर हाऊस शेजारी आहे. परंतु त्याच कार्यालयाचे तुटलेले दरवाजे, गळके छत, फुटलेल्या काचा, तुटलेले कंपाऊड अशी सेक्शनची अवस्था झाली असल्याने हे कार्यालय वापराविना धुळखात पडून आहे. हेच कार्यालय धुळखात पडून असल्यामुळे या कार्यालयाची तत्काळ दुरुस्ती करून पावर हाऊसमधून हलवून साबुर्डी रोडजवळ असणाºया कार्यालयात करावे, अशी मागणी करत आहे.खेड तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे ठिकठिकाणी रोहित्राजवळ मोठ्या मोठ्या काटेरी झाडांची वाढ झाली आहे. तसेच झाडांच्या वेली, झाडांच्या फांद्या रोहित्रावर गेल्या आहे. काही ठिकाणी रोहित्राजवळून रस्ता गेला तर लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असणाºया ठिकाणी नागरिकांची सतत वर्दळ असते. रोहित्राजवळच नागरी लोकवस्ती आहे.अनेकदा ट्रान्सफॉर्मरवरील विजेचा भार पाहाता ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेपेक्षा अधिक वीज कनेक्शन दिली जात असतात. यामुळे वारंवार फ्यूज उडण्याचे प्रकार घडत सतत होत असतात. मागेल त्याला सर्रास कनेक्शन मिळते.सध्या, परिसरात रब्बी हंगामातील कांदा लागवडीला वेग आला आहे. परंतु सतत वीज खंडित होत असल्यामुळे कांदा लागवडीसाठी घेतलेल्या मजुरांना शेतात विजेची वाट पाहात ताटकळत बसावे लागत आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणे