शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
3
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
4
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
5
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
6
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
7
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
8
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
9
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
10
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
11
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
12
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
13
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
14
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
15
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
16
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
17
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
18
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
19
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
20
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
Daily Top 2Weekly Top 5

भांडण मिटविल्याने दोघा भावांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:31 IST

भांडण मिटवल्याचा राग मनात धरून नऊ जणांनी दोघांवर लोखंडी कोयत्याने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

लोणी काळभोर : भांडण मिटवल्याचा राग मनात धरून नऊ जणांनी दोघांवर लोखंडी कोयत्याने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. होळकरवाडी (ता. हवेली ) येथे ही घटना घडली आहे.कुमार व गणेश झांबरे या दोन भावांना मारहाण करण्यात आली आहे. बुधवार (दि. २४ ) रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हंडेवाडी येथील स्टीलच्या गोडावून समोर झांबरे यांचे मित्र एकनाथ सुर्वे (रा. औताडेवाडी ) व शंभूराजे भोसले या दोघांचे गाडी घासल्याचे कारणांवरून किरकोळ भांडण झाले. ते गणेश झांबरे यांने मिटवले व तो घरी आला. काही वेळाने भोसले आपल्या मित्राला बरोबर घेऊन तेथे आला व गणेश याला आमचे भांडण सोडवण्यासाठी का आलास ? असे म्हणून ते दोघे तेथून निघून गेले.शुक्रवारी (दि. २६ ) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कुमार व गणेश झांबरे हे दोघे भाऊ आपला मित्र सागर हिंगे याचेसमवेत होळकरवाडी जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्यावर थांबले होते. यावेळी पाच दुचाकी वरून वरील नऊ जण आले. शंभूराजे भोसले याने गणेश यास शिवीगाळ केली व तु काय भाई लागून गेलास काय ? असे म्हणत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून हिंगे घाबरून बाजूला निघून गेला. यानंतर कुमार याने शंभूराजे यास भावाला मारहाण करू नकोस. काय असेल ते नंतर पाहू असे म्हणाला.याचा राग शंभूराजे यास आला व तो हातात लोखंडी कोयता घेऊन त्याचेवर धाऊन गेला. त्याने डोक्यावर मारण्यासाठी कोयता उगारला. कुमार याने प्रसंगावधान राखून आपला उजवा हात आडवा केला. त्यामुळे वार हाताच्या तळव्यावर बसला. याचवेळी तुला जिवे ठार मारून टाकतो असे म्हणून डोक्यावर वार केला. सनी शेवाळे याने लाकडी दांडक्याने तर चिराग शेवाळे याने लोखंडी गजाने कुमार व गणेश या भावांना हात व पाठीवर मारहाण केल्याने ते दोघे खाली कोसळले. त्यानंतर बालाजी पवार, निखिल लोहार, महेश पवार, युवराज लसकर, मयूर जंगमवाड यांनी हात व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.कुमार मारूती झांबरे ( वय २५, रा. होळकर वाडी, ता. हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंभूराजे भोसले ( रा. मयूर पार्क, हंडेवाडी ता. हवेली ), सनी मोहन शेवाळे, चिराग शेवाळे व बालाजी पवार ( तिघे रा. शेवाळवाडी, ता. हवेली ), सागर औताडे ( रा. औताडवाडी ), निखिल लोहार, महेश पवार, युवराज लसकर व मयूर जंगमवाड ( चौघेही रा. हंडेवाडी, ता. हवेली ) या नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.४डोके, हातावर वार करून, लाकडी दांडके व लोखंडी गज पाठीवर मारून, शिवीगाळ, दमदाटी करून हात व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

टॅग्स :Puneपुणे