शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जादा पाणी मागायला धजावेना महापालिका; मंत्र्यांपुढे पदाधिकारी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 06:02 IST

शहरासाठी १ हजार ३५० एमएलडी पाणीच मिळणार आहे, असे ठासून सांगणाऱ्या महापालिका पदाधिकारी व प्रशासनाने पाटबंधारे खात्याला ‘दिवाळीपर्यंत थांबा, त्यानंतर आम्ही १ हजार १५० एमएलडीच पाणी घेऊ’ अशी विनंती केली आहे.

पुणे : शहरासाठी १ हजार ३५० एमएलडी पाणीच मिळणार आहे, असे ठासून सांगणाऱ्या महापालिका पदाधिकारी व प्रशासनाने पाटबंधारे खात्याला ‘दिवाळीपर्यंत थांबा, त्यानंतर आम्ही १ हजार १५० एमएलडीच पाणी घेऊ’ अशी विनंती केली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यापुढे महापालिकेतील पदाधिकारी हतबल झाल्याचेच चित्र स्पष्ट झाले आहे. हे पत्र अतिरिक्त आयुक्तांनी पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांना पाठवले आहे.त्याआधी पाटबंधारे विभागाने महापालिकेला पत्र पाठवले होते. त्यात कालवा समितीत महापालिकेने १ हजार १५० एमएलडी पाणी घेण्याचा निर्णय झाला आहे, त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा कारवाई करावी लागेल, अशी तंबीच दिली आहे. महापालिका प्रशासनाने त्या पत्राची दखलच घेतली नाही. पाणी उचलणे सुरूच राहिले. त्यामागे ते काहीच करणार नाहीत, अशीच खात्री होती. मात्र, यावेळी पाटबंधारे विभागाने थेट पोलीस घेऊनच पंप बंदच करून टाकले. त्याची माहितीही महापालिकेला दिली नाही.पंप बंद होऊन विरोधक तसेच पाणी न मिळालेल्या भागाचा रोष वाढू लागल्यावर पदाधिकाºयांना जाग आली. मात्र त्यातही सूसंगती दिसत नाही. सांगताना महापौर मुक्ता टिळक यांच्यासह सर्वच पदाधिकाºयांनी महापालिकेच्या पाण्यात कपात झालेली नाही. आधी घेत होतो तेवढेच म्हणजे १ हजार ३५० एमएलडीच पाणी मिळणार आहे, असे सांगितले. प्रत्यक्षात महापालिकेने पाटबंधारे खात्याला पाठवलेले पत्र मात्र दिवाळीपर्यंत थांबा व नंतर आम्हीच १ हजार १५० एमएलडी पाणी घेऊ, असे विनंती करणारेच आहे.अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांना हे पत्र लिहिले आहे. तेही त्यांचे कालवा समितीच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करा, अशी तंबी देणाºया पत्रानंतर बºयाच दिवसांनी लिहिलेले आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहे. अशावेळी पाणी पुरवठा कमी झाला तर नागरिकांचा रोष होईल. आम्ही १ हजार १५० एमएलडी पाण्याच्या वितरणाचे नियोजन करू व दिवाळीनंतर तेवढेच पाणी घेऊ, असे त्यात स्पष्टपणे म्हटले आहे.

टॅग्स :Waterपाणी