शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

कुकडी प्रकल्पातील धरणे फुल, धरणक्षेत्रात मोठा पाऊस : सरासरी ९३.८६ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 02:48 IST

कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या पाच धरणांपैकी चार धरणे १०० टक्के भरली आहे. माणिकडोह धरण झाल्यापासून दुसºयांदा भरण्याच्या मार्गावर आहे. हे धरण ८३ टक्के भरले आहे.

नारायणगाव : कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या पाच धरणांपैकी चार धरणे १०० टक्के भरली आहे. माणिकडोह धरण झाल्यापासून दुसºयांदा भरण्याच्या मार्गावर आहे. हे धरण ८३ टक्के भरले आहे. गेल्या काही वर्षांत प्रथमच सर्व धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. सर्व धरणे सरासरी ९३.८६ टक्के भरलेली आहेत, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर व शाखाअभियंता जे. डी. घळगे यांनी दिली.कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेली जुन्नर आणि आंंबेगाव ताालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. दोन्ही तालुक्यातील धरणे जवळपास भरलेली आहेत. धरणे भरल्याने डिंभे आणि पिंपळगाव जोगा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत या वर्षी ९ टक्के पाणीसाठा वाढला आहे. सर्व धरणे मिळून २८ हजार ६६१ दलघमी (९३.८६ टक्के) पाणी प्रकल्पात साठले आहे. गेल्या वर्षी आजमितीला २५ हजार ८७८ दलघफूट ८४.७४ टक्के पाणीसाठा होता. येडगाव धरण भरल्याने या धरणातून विसर्ग करण्यात येणार आहे तर डिंभे धरणातून ५०० क्युसेक्स वेगाने घोडनदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येडगाव धरणात २८ हजार दलघमी पाणीसाठा आहे. हे धरण १०० आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासात १४ मिमी पाऊस झाला आहे. तर १ जूनपासून १ हजार ३८५ मि.मी. पाऊस झाला आहे. माणिकडोह धरणात ८ हजार ४४३ दलघमी पाणीसाठा आहे. हे धरण ८३ टक्के भरले आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासात ७१ मि.मी पाऊस झाला आहे. तर १ जूनपासून आजपर्यंत १ हजार २२५ मि.मी पाऊस झाला आहे. हे धरण १९९५ मध्ये भरले होते. त्यानंतर या वर्षी हे धरण भरण्याच्या मार्गावर आहे.पिंपळगाव जोगा धरणात ३ हजार ७३७ दलघमी पाणीसाठा आहे. धरण ९६ टक्के भरले आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासात १७ मि.मी. पाऊस झाला आहे तर १ जूनपासून आजपर्यंत १ हजार २०० मि.मी पाऊस झाला आहे. हे धरण भरल्याने या धरणातून २२० क्युसेक्स वेगाने येडगाव धरणात विसर्ग सुरू होता, तो आज बंद करण्यात आला.डिंभे धरणात १२ हजार ४९५ दलघमी पाणीसाठा असून हे धरण १०० टक्के भरले आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासांत २५ मि.मी पाऊस झाला आहे. तर १ जूनपासून आजपर्यंत १ हजार ४५४ मि.मी पाऊस झाला आहे. हे धरण भरल्याने या धरणातून ५०० क्युसेक्स वेगाने घोडनदीत विसर्ग सुरू आहे.चिल्हेवाडी धरणात ६९६ दलघमी पाणीसाठा आहे. हे धरण ८० टक्के भरले आहे. या धरणात १ जूनपासून आजपर्यंत १० हजार ३३ मि.मी पाऊस झाला आहे, अशी माहिती नन्नोर व घळगे यांनी दिली.

टॅग्स :Damधरण