शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देवी रडत असल्याची भिगवण परिसरात अफवा, अंधश्रद्धेपुढे मती चालेना, वस्तुस्थिती सांगूनही विश्वास बसेना...  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 03:01 IST

देव दूध पितो अशी अफवा पसरली आणि देशभरात मंदिरासमोर भक्तांच्या रांगा लागल्या याला काही वर्ष लोटली. याच प्रकारची भिगवण परिसरातही अफवा पसरली आहे. तुळजापूरची देवी रडत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात त्या मंदिराला भेट देऊन पाहिल्यानंतर ही अफवा असल्याचे सांगूनही यावर विश्वास महिलावर्ग ठेवत नसल्याचे दिसून येत आहे.

भिगवण : देव दूध पितो अशी अफवा पसरली आणि देशभरात मंदिरासमोर भक्तांच्या रांगा लागल्या याला काही वर्ष लोटली. याच प्रकारची भिगवण परिसरातही अफवा पसरली आहे. तुळजापूरची देवी रडत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात त्या मंदिराला भेट देऊन पाहिल्यानंतर ही अफवा असल्याचे सांगूनही यावर विश्वास महिलावर्ग ठेवत नसल्याचे दिसून येत आहे.भिगवण गावातील चार नंबर वार्ड मध्ये तुळजापूर देवीचे मंदिर आहे. पुनर्वसन होण्यापूर्वी जुन्या गावात असणारी मूर्तीची याठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. काही वर्षापूर्वी देवीचा असणारा पितळी मुखवटा चोरीला गेल्यानंतर दगडी मुखवटा बसविण्यात आला आहे. याच मंदिरातील मूर्ती गेली चार दिवसापासून रडत आहे आणि देवीच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत अशी अफवा कोणीतरी पसरवली. यावेळी देवीची सेवा करणाºया ताई सदाशिव बारहाते गावाला गेल्याने त्यांना याप्रकाराची माहिती मिळाली नाही. तर देवी रडतेय ही अफवा भिगवण परिसरात जोर धरू लागली. आसपासच्या तक्रारवाडी, मदनवाडी, पोंधवडी, कुंभारगाव पासून दौंड तालुक्यातील राजेगाव, कोशिमघर, टाकळी या गावातील हजारो महिला आणि भक्तांनी मंदिरासमोर रांगा लावीत पाहण्यासाठी गर्दी केली. तर याच अफवेत ज्या महिलेला एक मुलगा आहे तीने दारात रांगोळी काढून मध्यरात्री त्यावर दिवा लावावा अशी अफवा जोडली गेल्याने श्रद्धाळू महिलांनी त्यावर विश्वास ठेवून रांगोळीही काढली. त्यामुळे भिगवण परिसरात रात्रीच्या वेळेसही दारात दिवे पाहायला मिळत होते. ही अफवा नक्की कोणी पसरवली ही माहिती मिळत नसली तरी गेल्या दोन दिवसापासून आमच्या घरातील देवीचा फोटोतही देवी रडत असल्याचे सांगणारे दिवसभर भेटत होते.यातील काही जण अशिक्षित असले तरी शिकलेसवरलेही अफवा आहे यावर विश्वास ठेवण्यास तयार होत नव्हते.या मंदिराला जाऊन प्रत्यक्ष भेट दिली असता पूर्वेच्या दिशेला मुख असणाºया देवीच्या चेहºयावर चांदीचे डोळे बसविण्यात आले आहेत. त्याखाली गडद काळ्या रंगाच्या छटेवर दारातून उजेड पडल्याने तो भाग चमकत असल्याने तो पाणीदार दिसत आहे. त्यामुळेच कोणीतरी देवी रडत असल्याची अफवा पसरवली असल्याचे दिसून येत आहे. तर याठिकाणी सेवा करणाºया सेविका ताई बारहाते यांनी वर्षानुवर्षे देवीचा मुखवटा असाच असल्याचे सांगितले. तसेच मुखवट्यावर पाणी आढळून आले नसल्याचेही सांगितले.

टॅग्स :Puneपुणे