शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

...तर पावसाळ्यात सिंहगडावर जाणे होऊ शकते मुश्किल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 08:40 IST

गिर्यारोहकांसह पर्यटक आणि तरुणाईकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्या जाणा-या सिंहगड किल्ल्यावरील दुरूस्तीची कामे अद्यापही अपूर्णच आहे.मान्सूनच्या आगमनाला काही दिवसांचा कालावधी उरलेला आहे

पुणे: गिर्यारोहकांसह पर्यटक आणि तरुणाईकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्या जाणा-या सिंहगड किल्ल्यावरील दुरूस्तीची कामे अद्यापही अपूर्णच आहे.मान्सूनच्या आगमनाला काही दिवसांचा कालावधी उरलेला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी गडावरील रस्त्याच्या डांबरी करणाचे, दरड प्रवण भागात लोखंडी जाळी बसविण्याचे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षा भिंती उभारण्याचे काम पूर्ण करण्याचे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आहे.

वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वादामुळे गेल्या काही वर्षांपासून सिंहगड किल्ल्यावरील रस्त्याच्या दुरूस्तीची कामे रखडली होती.त्याचप्रमाणे गडावरील दरड प्रवण भागात लोखंडी जाळी बसविण्यास विलंब होत होता. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टप्प्या-टप्प्याने रस्त्याच्या दुरूस्तीची आणि लोखंडी जाळी बसविण्याची कामे सुरू करण्यात आली. रस्त्याच्या दुरूस्तीसाठी काही महिने गडावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. त्यामुळे गडावर सिमेंट काँक्रीटचा पक्का रस्ता तयार झाला. त्यामुळे गडावर जाणे-येणे सुखकर झाले आहे.

सिमेंटच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी डांबरी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र, पुढील दोन दिवसात रस्त्याच्या डांबरिकरणाचे काम सुरू करण्याते येणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोखंडी जाळीचा वापर करून सुरक्षा भिंती उभ्या केल्या जात आहेत. तसेच दरड प्रवण भागात जाळी बसविण्याचे साहित्य येवून पडले आहे. दरड कोसळण्याची शक्यता असणा-या भागात पावसाळा सुरू होण्यापूर्वी जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण करावे लागणार आहे.पाऊस सुरू झाल्यानंतर दुरूस्तीची प्रलंबित कामे करता येणार नाहीत.त्यामुळे पुढील काही दिवसातच सर्व कामे पूर्ण करण्याचे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभगासमोर आहे.

 सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एन. देशमुख म्हणाले, सिमेंटच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे पर्यटकांना गडावर येण्यास कोणत्याही अडचणी येत नाहीत.एका वळणावर केवळ 12 मिटर रुंदीचा सिमेंटचा रस्त्या आहे. परंतु, पर्यायी उपाययोजना करून या रस्त्याची रूंदी वाढविली जाईल. त्याचप्रमाणे सध्या गडावर रस्त्याच्या डांबरी करणाचे काम सुरू आहे.रविवार असल्यामुळे काम बंद ठेवले होते. मात्र,येत्या मंगळवारपासून रस्त्याचे अपूर्ण काम सुरू केले जाईल.गडावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणा-या विविध उपाय योजना सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केल्या जाणार आहेत.सुरक्षेचा भाग म्हणून गडावरील रस्त्यावर रिफ्लेक्टर लावले जातील. सध्या  गडावरील काही कामे अपूर्ण असल्याचे दिसून येत असले तरी पुढील 15 दिवसात सर्व उर्वरित कामे केले जातील.-डी.एन.देशपांडे,कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम,दक्षिण विभाग,पुणेपावसाळ्यात गडावर गर्दी वाढण्याची शक्यता उन्हाचा चटका बसत असल्यामुळे रविवारी (दि.19) सुट्टी असूनही सिंहगडावर फारशी गर्दी झाल्याचे दिसून आले नाही. परतु,गडावर जाण्यासाठी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.त्यातच पुढील काही दिवसात गडाच्या पायथ्यापासून ते गडापर्यंतचा रस्ता चांगला होईल.परिणामी पावसाळ्यात गडावर पर्यटकांची गर्दी झालेली दिसून येईल,असे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिका-यांनी सांगितले.  

टॅग्स :sinhagad fortसिंहगड किल्लाroad safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस