शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

माल वाहतुकदारांच्या संपामुळे पुण्यातील माल वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 14:31 IST

देशातील डिझेलचे दर एकच करावेत, प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचार, टोलमधील अडचणी अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसच्या दोन दिवसीय आंदोलनास सोमवारपासून सुरुवात झाली.

ठळक मुद्दे

पुणे - देशातील डिझेलचे दर एकच करावेत, प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचार, टोलमधील अडचणी अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसच्या दोन दिवसीय आंदोलनास सोमवारपासून सुरुवात झाली. ट्रक, टॅम्पो, टँकर अशी वाहने यात सहभागी झाल्याने, मालवाहतूक त्यामुळे काही प्रमाणत विस्कळीत झाली.    जीएसटीतील काही अटींमुळे जुन्या गाड्यांच्या विक्रीसह इतर गाड्यांच्या विक्रीवर दुहेरी कराला प्रोत्साहन मिळत आहे. ई-मार्ग विधेयक आणि प्रस्तावित ई-वे बिल हे परिवहन क्षेत्रासाठी अनुकुल नाही. जुन्या गाड्यांच्या विक्रीवर जीएसटी लागू करु नये, परिवहन कार्यालय क्षेत्रा अंतर्गत सेवा कर लागू करु नये आणि मालवाहक चलान असलेल्यांना ई-मार्ग बिल लागू करु नये, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यत आली आहे. डिझेल आणि टोलचा खर्च हा एकूण व्यवस्थापन खर्चाच्या ७० टक्के इतका आहे. प्रत्येक प्रदेशात डिझेलचा दर वेगवेगळा असल्याने या व्यवसायावर परिणाम होत आहे. डिझेलचा दर देखील देशात एक असावा. तसेच जिझेलचा दर हा दर तीन महिन्यांनी बदलण्यात यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.  देशातील टोलमधून होणारी रक्कम ही देशात चालणा-या नॅशनल परमिट वाहनांवर आकारावी, त्यामुळे टोमुळे होणारी रांग आणि इंधन वाचेल व भारत टोलमुक्त होईल, अशी मागणी देखील त्यात करण्यात आली आहे. कर अधिकारी आणि प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी देखील चुकीच्या पद्धतीने वाहनांची तपासणी करीत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना चिरीमिरीच्या माध्यमातून अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागतो. हा प्रकार थांबविण्यासाठी महामार्गावर विशेष तपास पथक सुरू करावे. त्याच बरोबर मोटार वाहन कायद्यातील नियमांमध्ये अधिक स्पष्टता आणावी आणि असंदिग्ध बाबी काढून टाकाव्यात. याचबरोबर अधिका-यांना दिलेला वाहन थांबविण्याचा असलेला अधिकार काढून टाकावा. अगदी विशेष कारणास्तव आणि गोपनीय माहितीच्या आधारेच वाहनांना थांबविले गेले पाहिजे. हा अधिकार देखील पोलीस अधिक्षक अथवा पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांना द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या संघटनेच्या अंतर्गत देशभरातील तब्बल ९३ लाख मालवाहतूक ट्रक्स अणि ५० लाख प्रवासी बस येतात. तसेच, देशातील २० कोटी नागरिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या संघटनेशी संबंधित आहेत.  

टॅग्स :Puneपुणे