शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 00:34 IST

आकाशातील ढगाळ वातावरणामुळे हवामान दमट होऊ लागले आहे. रब्बीला पोषक थंडी अजूनही पडत नसल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.

शेलपिंपळगाव  - आकाशातील ढगाळ वातावरणामुळे हवामान दमट होऊ लागले आहे. रब्बीला पोषक थंडी अजूनही पडत नसल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. हातातोंडाशी आलेले रब्बीचे पीक वाचविण्यासाठी शेतकरी पिकांना रासायनिक औषधांचा डोस देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.चालू वर्षी खरीप; तसेच रब्बी हंगामात दूषित हवामानाशी दोनहात करीत पिकांचे उत्पादन काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे; मात्र अशा विपरीत परिस्थितीने बळीराजाचे शेतीविषयक आर्थिक बजेट पूर्ण कोलमडून शेतकरी चिंतातूर होऊ लागला आहे. रब्बी हंगामातील कांदा पिकावर लागवडीपासून आजपर्यंत दोन ते तीन वेळा रासायनिक औषधांची फवारणी शेतकºयांनी केली आहे. तरीसुद्धा कांद्यावरील रोगराईचे सावट काही केल्या दूर होत नसल्याची सत्यस्थिती समोर येत आहे. पर्यायी पिकांवर चौथ्यांदा फवारणीचा फेरा शेतकºयांनी सुरू केला आहे.खेडच्या पूर्व; तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने खरीप व रब्बीच्या मुख्य दोन हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. विशेषत: या हंगामात कांदा, ज्वारी, मका, फूलझाडे, पालेभाज्या व फळपिकांकडे शेतकरी अधिक आकर्षित झालेला असून, या पिकांव्यातिरिक्त कोबी, फ्लॉवर, मका, पालेभाज्या, वेलवर्गीय व तोडीव पिकांची शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे; मात्र बहुतांशी सर्वच पिकांना लहरी हवामानाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.आगाप कांदा पीक अगदीच लागवडीपासून धोक्यात असून, विविध रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिके खराब होऊन वाढ खुंटली आहे. दमट वातावरणामुळे पिकांवर करपा, मावा व पीळ रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे आर्थिक झळ सोसून महागडी रासायनिक औषधांची फवारणी शेतकरी करू लागला आहे.रब्बी हंगामाच्या दृष्टीने ढगाळ वातावरण नेहमीच धोकादायक असते. थंड वातावरण पिकांच्या; तसेच उत्पादनवाढीच्या दृष्टीने अनुकूल असते. चालू हंगामात ढगाळ वातावरण सारखे-सारखे पसरत असल्याने दमट हवामान होऊन त्याचा पिकांवर विपरीत परिणाम घडून येत असल्याने आर्थिक झळ सहन करून महागडी रासायनिक औषधे पिकांवर मारावी लागत आहे.- जानकू दौंडकर, शेलपिंपळगावप्रतीक्षा थंडीची...खेड; तसेच शिरूर तालुक्यात प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मुबलक पाणी ही शेतकºयांसाठी जमेची बाजू ठरत आलेली आहे; मात्र हवामानाची साथ मिळत नसल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता वातावरणातील थंडावाच पिकाला पोषक ठरणार आहे.तोडणीची पिकेही आजारी...रब्बी हंगामातील तोडीव पिकांना बाजारात चांगली मागणी असल्याने त्यांचे बाजारभावही तेजीत आहेत. परिणामी मिरची, गवार, भेंडी, वालवर, वांगी आदी पिकांचे उत्पादन शेतकरी घेत आहे;परंतु तोडीव पिकांही रोगराईच्या सावटाखाली असल्याने उत्पादनात घट घडून येऊ लागली आहे.

टॅग्स :agricultureशेतीPuneपुणे