शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

चंपाषष्ठीनिमित्त पुण्यातील धामणी येथील खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 16:49 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी येथील कुलस्वामी खंडेरायाच्या दर्शनासाठी चंपाषष्ठी निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्देमल्हारी महाराज शेवाळे यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाबरोबर महाप्रसादाचे आयोजनभाविकांनी घातली कुलदैवत खंडोबाची एक हजारांहून अधिक पाच नामाची जागरणे

लोणी धामणी : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी येथील कुलस्वामी खंडेरायाच्या दर्शनासाठी चंपाषष्ठी निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सालाबादप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध शष्ठी अर्थात चंपाषष्ठी हा कुलस्वामी खंडोबाचा जन्म दिवस धामणी गावात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी ह. भ. प. मल्हारी महाराज शेवाळे यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाबरोबर महाप्रसादाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने  करण्यात आले होते. कुलस्वामी खंडोबा देवास पांडुरंग केशव जाधव या धामणीतील भाविकाने खंडोबा देवाची प्रतिकृती म्हणून सव्वा दोन किलो वजनाचा चांदीचा मुखवटा सकाळी अभिषेक करून व गावातून पालखीतून मिरवणूक काढुन अर्पण केला.दिवसभर सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात मंदीर परिसर भक्तिमय वातावरणात गजबजून गेला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकभक्तांनी सकाळ पासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यादिवशी भाविकांनी मंदिर परिसरात कुलदैवत खंडोबाची एक हजारांहून अधिक पाच नामाची जागरणे घातली. संध्याकाळी उशिरापर्यंत भाविक खोबरे, भंडाराची उधळण करत होते. मंदिर परिसरात खोबरे, भंडार, खेळणी, इ दुकाने लावली होती. मंदिरातील दर्शनरांग  तसेच पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन जीर्णोद्धार समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. 

टॅग्स :Puneपुणे