शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' दोन रणरागिणींच्या सतर्कतेमुळे आजोबांना मिळाले उपचार, आदर्श वर्तनाचा धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 13:16 IST

त्या दोघीही आजोबांच्या मदतीला धावून जातात. आजोबांना काहीच सांगता येत नव्हते.

पुणे : सायंकाळी सहाची वेळ. स्वारगेट बसस्थानकाचा परिसर. एक आजोबा बसमध्ये चढताना पडतात आणि त्यांच्या डोक्याला जखम होते. यावेळी तेथील एक अली अजगर हे त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांची मदत पुरेशी नव्हती. यावेळी दिवसभराचे कर्तव्य पार पाडून दोन महिला पोलीस कर्मचारी घरी निघालेल्या होत्या. त्यांच्या निदर्शनास हा प्रकार येतो. तत्काळ त्या दोघीही आजोबांच्या मदतीला धावून जातात. आजोबांना काहीच सांगता येत नव्हते.रिक्षावाल्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असताना देखील ते थांबत नव्हते. एका वाहतूक पोलिसाच्या मदतीने त्यांनी कसेबसे एका रिक्षावाल्याला थांबविले व आजोबांना त्यामधून दवाखान्यात घेऊन गेले. दोन्ही कर्मचाऱ्यांनी आजोबांना ससूनला न नेता प्रसंगावधान राखत त्यांना त्यांच्या नेहमीच्या दवाखान्यात घेऊन गेल्या. रात्री अकराच्या सुमारास त्यांच्यावर उपचार करून घरच्यांच्या ताब्यात दिले. पर्किन्सन्सचा आजार असलेल्या आजोबांना घरातील मंडळी खूप जपतात. मात्र त्या दिवशी ते कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडले होते. त्यांनी ही केलेल्या मदतीविषयी कोणाला सांगितले नव्हते.या आजोबांवर गेली २० वर्षे उपचार करणारे डॉ. नितीन बोरा यांनी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांना ई मेल करून त्या दोन महिला पोलिसांनी दाखविलेल्या माणुसकीची बाब उघड केली. राजनंदिनी साळवे व भाग्यश्री वाघमारे अशी या दोन महिला पोलीस कर्मचा-यांचे नावे आहेत. त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे होते. याबाबत राजनंदिनी साळवे यांनी सांगितले की, २५ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. आम्ही दोघी पोलीस आयुक्त कार्यालयात स्क्रीप योजनेचे काम पाहतो.बसने घरी जात असताना स्वारगेटला गर्दी दिसल्याने पाहिले तर, एक आजोबा रक्ताने माखलेल्या अवस्थेत होते. कोणीही मदत करायला पुढे येत नव्हते. त्यांची काळजी घेणे गरजेचे होते. म्हणून आम्ही त्यांना रिक्षातून खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यावर दुस-या रिक्षातून पदमावती परिसरात बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्यांचे नातेवाईकाचा शोध लागला होता. त्यांच्या नातेवाईकांनी नंतर डॉ. बोरा यांच्याकडे नेले. आजोबांना त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली करणे, हेच आमच्या दोघींचा मनात असल्याने व ते पूर्ण झाल्याने ही गोष्ट आम्ही कोणाला सांगितले नाही, असे साळवे यांनी सांगितले.