शेलपिंपळगाव : सिद्धेगव्हाण (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या शोषखड्ड्यात पडलेल्या दोन नागांना व एका धामणीला नागरिकांच्या सतर्कतेने जीवदान मिळाले. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातील शोषखड्ड्यात नाग पडल्याचे शाळेतील मुलांना आढळून आले. त्यानंतर ही सर्व माहिती विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष प्रकाश चौधरी यांना मुलांनी दिली. चौधरी यांनी तत्काळ शिक्रापूर-तळेगाव येथील पुणे वनविभागाचे सर्पमित्र गणेश टिळेकर यांना घटनास्थळी बोलावून घेतले. टिळेकर यांनी शिताफीने शोषखड्यातील नागाला बाहेर काढले. त्यानंतर लगतच्या खड्ड्यांची बंद झाकणे उघडून पाहिले असता त्यातही नाग आणि धामण आढळून आली. याप्रसंगी प्रकाश चौधरी, उपसरपंच अशोक मोरे आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
खेडमधील नागरिकांच्या सतर्कतेमुळे शोषखड्ड्यात पडलेल्या २ नाग आणि एका धामणीला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 15:26 IST
सिद्धेगव्हाण (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या शोषखड्ड्यात पडलेल्या दोन नागांना व एका धामणीला नागरिकांच्या सतर्कतेने जीवदान मिळाले.
खेडमधील नागरिकांच्या सतर्कतेमुळे शोषखड्ड्यात पडलेल्या २ नाग आणि एका धामणीला जीवदान
ठळक मुद्दे जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील शोषखड्ड्यात नाग पडल्याचे शाळेतील मुलांना आढळलेसर्पमित्र गणेश टिळेकर यांनी शिताफीने शोषखड्यातील नागाला काढले बाहेर