शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोरेगाव भिमात स्टेट बँक फोडण्याचा प्रयत्न फसला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 17:40 IST

कोरेगाव भिमा येथील भारतीय स्टेट बँक फोडण्याचा गुरुवार (दि. २८ ) रोजी रात्री दिडच्या सुमारास चोरट्यांनी प्रयत्न केला होता, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच पोलीस प्रशासनाला बोलविल्यानंतर चोरीचा प्रयत्न फसला.

ठळक मुद्देसर्वच बँकेच्या सुरक्षीततेबाबत बँक अधिकारी व बँक प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.या बँकेमध्ये ३१ जानेवारी २०१५ मध्ये चोरट्यांनी बँकेच्या आतमध्ये प्रवेश करून बँकेच्या स्ट्राँगरुममध्ये प्रवेश केला होता.मागील महिन्यात ४ आॅगस्ट २०१७ रोजी देखील चोरट्यांनी स्टेट बँकेच्या एटीएम मशीन बाहेरील लॉक तोडून आतमध्ये प्रवेश करत बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता.

कोरेगाव भीमा : कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील भारतीय स्टेट बँक फोडण्याचा गुरुवार (दि. २८ ) रोजी रात्री दिडच्या सुमारास चोरट्यांनी प्रयत्न केला होता मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच पोलीस प्रशासनाला बोलविल्यानंतर चोरीचा प्रयत्न फसला असून यापूर्वीही ३१ जानेवारी २०१५ रोजी बँक फोडण्याचा प्रयत्न फसला. मात्र बँक प्रशासन बँकेच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीच ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न करीत नाही.सर्वच बँकेच्या सुरक्षीततेबाबत बँक अधिकारी व बँक प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोरेगाव भीमा येथील बँकेच्या पूर्व बाजुकडील भिंतीजवळ काही चोरट्यांनी प्रवेश करुन भिंत फोडण्यास सुरुवात केली. जवळच असलेल्या फ्लेक्स दुकानामध्ये प्रींटिंगचे काम चालु असताना हरिष चव्हाण व इतर तरुणांना बँकेजवळ मोठ्याने आवाज येत असल्याचे जाणवले. त्यांनी विक्रम दौंडकर यांना कल्पना दिली. त्यानंतर हरिष चव्हाण यांनी त्यांच्या चारचाकी वाहनाची लाईट बँकेच्या बाजूकडे केली असता त्यांना एक चोरटा बँकेची भिंत फोडत असल्याचे पाहिले. दरम्यान विक्रम दौंडकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेली बीट मार्शल वाहन त्या ठिकाणी तातडीने दाखल झाले. पोलीस उपनिरिक्षक गणेश वारुळे यांनी परिसरात नाकाबंदी करुन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.   कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे भारतीय स्टेट बँक तसेच या बँकेचे एटीएम असून या बँकेमध्ये ३१ जानेवारी २०१५ मध्ये चोरट्यांनी बँकेच्या आतमध्ये प्रवेश करून बँकेच्या स्ट्राँगरुममध्ये प्रवेश केला होता, परंतु अचानक सायरन वाजू लागल्याने चोरटे पळून गेले . तर मागील महिन्यात ४ आॅगस्ट २०१७ रोजी देखील चोरट्यांनी स्टेट बँकेच्या एटीएम मशीन बाहेरील लॉक तोडून आतमध्ये प्रवेश करत बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यावेळी नागरिक आल्याची चाहुल लागल्याने चोरटे पळून गेले होते. मात्र त्यांनतर अवघ्या काही दिवसातच चोरट्यांनी शिक्रापूर येथील स्टेट बँकेचे एटीएम पंधरा लाख रुपयांसह २३ आॅगस्ट रोजी चोरून नेले असल्याची घटना घडली. त्यांनतर पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी एटीएम मशीन चोरणाºया चोरट्यांना अटक केली असता त्यांनी कोरेगाव भिमा येथे देखील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे कबुल केले होते. 

टॅग्स :ThiefचोरbankबँकPolice Stationपोलीस ठाणे