शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंच्या वाहन लिलावात नवा तिढा ;संपत्तीबाबत 20 हरकती अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 20:03 IST

गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यासाठी डीएसकेंच्या एकूण तेरा गाड्यांचा लिलाव करण्यात येणार होता. त्यापैकी आठ वाहने ही डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत.

पुणे : गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यासाठी डीएसकेंच्या एकूण तेरा गाड्यांचा लिलाव करण्यात येणार होता. त्यापैकी आठ वाहने ही डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. या कारणास्तव ती लिलावाव्दारे विकु नयेत. असा अर्ज सोमवारी डीएसके प्रकरणात बचाव पक्षाकडून येथील विशेष न्यायालयात करण्यात आला आहे.आठ वाहने शिरीष कुलकर्णी यांच्या नाही तर कंपन्यांच्या मालकीची आहे, हे लक्षात आल्यानंतर आम्ही अर्ज केला. वाहनांच्या मालकीबाबतचे कागदपत्रे सादर केल्याचे अ‍ॅड. राजोपाध्ये यांनी न्यायालयास सांगितले. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी या अर्जास विरोध केला. संबंधित अर्ज शिरीष कुलकर्णी यांच्या नावाने करण्यात आला आहे. फौजदारी संहिता कायद्यामध्ये पुनर्विचार करण्याची तरतूद नाही. त्यामुळे आहे तोच आदेश न्यायालयाने कायम ठेवावा, असा युक्तिवाद अ‍ॅड. चव्हाण यांनी केला.लिलाव करण्यात येत असलेली काही वाहने डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या मालकीच्या आहेत, असे यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात त्यातील 8 वाहने डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत. त्यांचा लिलाव करण्याचा अधिकार आत्ता सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयास नाही तर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाला आहेत. त्यामुळे हा लिलाव रद्द करावा किंवा संबंधित आठ गाड्या वगळून लिलाव करावा, अशी मागणी करणारा अर्ज शिरीष कुलकर्णी यांचे वकील प्रदीप राजोपाध्ये आणि आशिष पाटणकर यांनी विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात केला आहे. ही आठही वाहने आलिशान व महागडी आहेत. संपत्तीबाबत 20 हरकती अर्जडीएसकेच्या संपत्तीबाबत कुणाची हरकत असल्यास न्यायालयात हजर राहून आपल्या हरकती नोंदविण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या होत्या. त्यानुसार या संपत्तीबाबत सुमारे 20 हरकती दाखल झाल्या आहेत. त्यात सांगली सरकारी बँक आणि ईडी यांची देखील प्रत्येकी एक हरकत आहे.  ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांचे नातेवाईक जप्त करण्यात आलेल्या 463 स्थावर आणि जंगम मालमत्ता विक्री करण्याबाबत जाहीर नोटीस काढण्यात आली आहे.   

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस.कुलकर्णीCourtन्यायालय