शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डीएसके समूहाची ९०४ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 00:25 IST

डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सकडून गुंतवणुकदारांच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ई.डी.) मनी लॉडरिंग अ‍ॅक्टनुसार डीएसके समूहाच्या ९०४ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्ती आणली आहे.

पुणे : डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सकडून गुंतवणुकदारांच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ई.डी.) मनी लॉडरिंग अ‍ॅक्टनुसार डीएसके समूहाच्या ९०४ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्ती आणली आहे. त्यामध्ये जमीन, इमारत, सदनिका, जीवनविमा योजनांमधील गुंतवणूक, बँक खात्यांमधील रोख ठेवी यांचा समावेश आहे.डी. एस. के. समूहाच्या वतीने राज्यातील गुंतवणुकदारांची १ हजार १२९ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत डी. एस. कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी व मुलगा शिरीषकुलकर्णी यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या तिघा संचालकांनी विविध ठेवी जमा योजना राबवून त्यामध्ये ३५ हजार गुंतवणूकदार, ठेवीदारांनी ठेवलेल्या १ हजार १२९ कोटी रुपयांचा अपहार करुन फसवणूक केली आहे़या प्रकरणाचा तपास करत असताना केवळ ठेवी जमा करण्याच्या हेतूने डी़ एस़ कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी आणि शिरीष कुलकर्णी यांनी इतरांच्या सहाय्याने डीएसके नावाने वेगवेगळ्या ८ भागीदारी संस्था स्थापन केल्या़ सामान्य गुंतवणुकदारांना त्या कंपन्या या डीएसकेडीएल या लिमिटेड कंपनीचाच भाग असल्याचे भासवून त्याद्वारे २००६ ते २०१७ दरम्यान त्याच्या कालावधीत ३ हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या़ ठेवीची जमा रक्कम भागीदारी संस्थेमधून प्रथम हेमंती कुलकर्णी यांच्या खात्यात जमा केली जात असे. तेथून ती इतर कंपन्या व दीपक कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी व इतर नातेवाईक व इतर कंपन्यांमध्ये वर्ग केली जात असे़ हेमंती कुलकर्णी यांनी १७०, दीपक कुलकर्णी यांना १८५ कोटी, शिरीष कुलकर्णी यांना ३५० कोटी रुपये डीएसके ग्लोबल एज्युकेशन या कंपनीला तसेच २ हजार २०० कोटी रुपये डीएसकेडीएल या लिमिटेड कंपनीला वर्ग केले़अमेरिकेत १०० कोटींची मालमत्ता खरेदीया तिघांनी गोळा केलेल्या ठेवीतून अमेरिकेत १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पाठवून तेथे मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात दिसून आले आहे़ तसेच ठेवीची रक्कम मोठमोठ्या रक्कमेच्या विमा योजना खरेदीसाठी, चंगळवादी खर्चासाठी वापरली आहे़

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी