शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंना अखेर दिल्लीतून अटक, पुणे पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 09:05 IST

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना आज पहाटे दिल्लीतून अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून त्यांना दिल्लीहून पुण्याला आणले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

नवी दिल्ली : पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना शनिवारी पहाटे  दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून त्यांना दिल्लीहून पुण्याला आणले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. गुंतवणूकदारांची 230 कोटींची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटकेपासून दिलेले संरक्षण शुक्रवारी उच्च न्यायालयाने काढून घेतल्याने डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक करण्यात येणार होती. त्यांच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी चार पथके राज्याबाहेर रवाना केली होती. अखेर आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास दिल्लीतून डीएसके यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. याचबरोबर त्यांना आज पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डीएसकेंना नोव्हेंबरमध्ये अंतरिम संरक्षण देताना गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. डीएसकेंनी ते मान्यही केले. हे पैसे भरण्यासाठी उच्च न्यायालयाने डीएसकेंना अनेकदा मुदतवाढही दिली. तरीही काहीना काही बहाणा करून डीएसके वेळ मारुन नेत होते. डीएसकेंनी न्यायालयाला गृहित धरले. त्यांनी गुंतवणूकदारांसह न्यायालयाची फसवणूक व विश्वासघात केला. त्यांना अटकेपासून संरक्षण दिले जाऊ शकत नाही, असे न्या. साधना जाधव यांनी संतप्त होत म्हटले.गुंतवणूकदारांचा माझ्यावर विश्वास आहे, हे बाहेर तुम्ही कोणत्या तोंडाने सांगता? न्यायालयाचाही तुमच्यावर विश्वास नाही. तुम्हाला न्यायालयात बोलावले, तेव्हाच अटकेचा आदेश दिला असता. मात्र, गुंतवणूकदारांचे हित साधण्यासाठी मी पैसे भरण्यासाठी संधी दिली. मात्र, तुम्ही केवळ बनाव करून वेळकाढूपणा करत आहात, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने डीएसकेंना फटकारले होते. 

- बुलडाणा अर्बन पतपेढी १०० कोटींचे कर्ज देणार असल्याचे डीएसकेंनी सांगितले होते. मात्र, ते ज्या जमिनी बँकेला विकून पैसा उभा करणार होते, त्या याआधीच बँक आॅफ महाराष्ट्रकडे तारण ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुणे ईओडब्ल्यूने १५ फेब्रुवारी रोजी न्या. जाधव यांना २२ फेब्रुवारीची सुनावणी शुक्रवारी घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणे