पाईट : भामा आसखेड धरणातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मिटल्याशिवाय एक थेंबही पाणी पुणे महगनगरपालिकेला मिळणार नाही. जलवाहिनेचे मशिनरी फोडून बंद केलेले काम हे केवळ शासनाला जागे करण्यासाठी दिलेली समज होती. आम्हाला शिवसेना स्टाईलने आंदोलन करावयास भाग पाडू नका, असा इशारा आमदार सुरेश गोरे यांनी दिला.भामा आसखेड धरणातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची पुनर्वसनच्या नियोजनासठी व आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी करंजविहिरे येथे बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, प्रकाश वाडेकर, चासकमान धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष कदम, भामा असखेड कृती समिती अध्यक्ष रोहिदास गडदे, चांगदेव शिवेकर, दत्ता रौंधळ, लक्ष्मण जाधव, महादेव लिंभोरे, सुभाष मांडेकर, दत्ता होले, आशा साकोरे, सुभाष डांगले, संभाजी कोळेकर, किरण मांजरे, सत्यवान नवले, गुलाब शिवेकर, सयाजी कोळेकर, नंदू शिवेकर, रामदास खेंगले, रमेश कोळेकर उपस्थित होते.गोरे म्हणाले, ज्यांना श्रेय घ्यायचे आहे, त्यांनी अवश्य घ्या. मला श्रेय घेण्यासाठी नाही, तर धरणग्रस्तांना न्याय देण्यासाठी लढा द्यायचा आहे. तर माजी आमदार दिलीप मोहिते यांचे नाव न घेता, ते म्हणाले, या पूर्वीच्या लोकप्रतिनिधीने शेतकऱ्यांचा विचार न करता धरणातील सर्व पाणीच विकून टाकले आहे. त्यांना आता या विषयावर बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही.मागील आमदार व खासदार या लोकप्रतिनिधींनी भामा आसखेड धरणग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याने पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला असून प्रकल्पातील अवघ्या १४५ शेतकऱ्यांनापाणी देण्यासाठी पाणी शिल्लक नाही, असे कृती समितीचे अध्यक्ष रोहिदास गडदे यांनी सांगितले.दत्ता होले यांनी एक वर्षापूर्वी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. त्या वेळी केलेल्या मागण्यांवर ‘जैसे थे’ स्थिती असून त्या वेळच्या १२ मागण्या एक वर्षात पूर्ण होत नसेल, तर अगोदर पुनर्वसना नंतरच जलवाहिनीला सुरुवात ही मागणी कायम आहे, असे गोरे या वेळी म्हणाले. या वेळी प्रकाश वाडेकर, शिवाजी वर्पे, किरण मांजरे, दत्ता रौंधळ, रामदास खेंगले, किरण चोरघे, महादेव लिंभोरे, संभाजी कोळेकर, चांगदेव शिवेकर आदींनी भूमिका मांडली.
एक थेंबही पुण्याला देणार नाही
By admin | Updated: October 26, 2015 01:50 IST