शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भोर तालुक्यात शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 00:37 IST

धोमबलकवडी कालव्याला सोडलेले पाणी बंद होण्याची वेळ आली, तरी चिखलगाव-धोंडेवाडी येथील पोटचारीला पाणी सोडले नसल्याने व म्हकोशी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याने चार गावांतील शेतीला व पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे.

भोर : धोमबलकवडी कालव्याला सोडलेले पाणी बंद होण्याची वेळ आली, तरी चिखलगाव-धोंडेवाडी येथील पोटचारीला पाणी सोडले नसल्याने व म्हकोशी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याने चार गावांतील शेतीला व पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे. पाणी सोडण्याबाबत वाई पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची शेतक-यांनी भेट घेऊन निवेदन देऊनही पाणी सोडत नसल्याने संतप्त शेतकºयांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.वीसगाव व आंबवडे खोºयातील बागायती पिके वाळून जात असल्याने शेतक-यांनी शेतीला पाण्याचे आर्वतन सोडण्याची मागणी केली होती त्यानुसार मागील आठवडाभरापासून धोमबलकवडी धरणाच्या कालव्यातून पाण्याचे आर्वतन सुरू आहे. मात्र, चिखलगाव येथील धोंडवाडी येथील पोटचारीला पाणी सोडले नाही. त्यामुळे टिटेघर, कोर्ले, वडतुंबी, म्हकोशी, चिखलगाव येथील बागायती पिके पाण्याआभावी जळू लागली आहेत. तर, म्हाकोशी बंधाºयातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने बंधाºयाच्या पाण्यावर असलेल्या टिटेघर, कोर्ले, वडतुंबी, म्हकोशी येथील नळपाणी पुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे.टिटेघर गावातील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांनी आणि शेतकºयांनी वाई पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन निवेदन देऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती.त्या वेळी लवकरच पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले; मात्र अद्याप पाणी सोडलेले नसून धोमबलकवडी धरणाच्या कालव्याचे पाणी सोडण्याचे २८ डिसेंबरला बंद करण्याची शक्यता आहे आणि तसे झाल्यास पोटचाºयांना पाणी मिळणार नसल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या नळपाणी पुरवठा योजना उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच अडचणीत येतील. यामुळे संतप्त शेतकरी नाराज झाले असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.दरम्यान, धोमबलकवडी धरणाच्या पोटचाºयांना पाणी सोडावे म्हणून सोपान नवघणे, अरविंद जाधव, मोहन जेधे, राजेंद्र साळेकर, चंद्रकांत साळेकर यांनी व शेतकºयांनी आमदार संग्राम थोपटे यांची भेट घेऊन निवेदन दिले. धोमबलकवडी धरणाच्या कालव्यातून शेतीला व पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू असून कालव्यातून धोंडेवाडी येथील पोटचाºयांना पाणी सोडण्याच्या सूचना वाई पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत. पाणी सुरू होईल, असे आमदार संग्राम थोपटेयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे