शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

बांधकाम मजुरांच्या घरांचे स्वप्न होणार स्वस्त - संभाजी पाटील निलंगेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 02:02 IST

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घरासाठी दिल्या जाणाऱ्या २ लाख रुपयांच्या अनुदानात आता ५० हजार रुपयांची वाढ राज्य सरकारने केली आहे.

पुणे - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घरासाठी दिल्या जाणाऱ्या २ लाख रुपयांच्या अनुदानात आता ५० हजार रुपयांची वाढ राज्य सरकारने केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळणारे अनुदान धरून बांधकाम कामगारांना घरासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक साह्य मिळू शकणार असल्याची माहिती राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शनिवारी दिली.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना मिळणाºया लाभांचे वाटप करण्यासाठी कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपमेंट अ‍ॅथोरिटी (क्रेडाई) पुणे मेट्रोच्या वतीने नांदेड सिटी येथे आयोजित कार्यक्रमात निलंगेकर बोलत होते. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, सचिव रणजित नाईकनवरे, दर्शना परमार, जे. पी. श्रॉफ, मिलिंद तलाठी, शैलेंद्र पोळ, विकास पानवेलकर, डॉ. डी. के. अभ्यंकर, ऊर्मिला जुल्का उपस्थित होते. निलंगेकर म्हणाले, येत्या २५ वर्षांत पायाभूत सुविधांमधील होणारी वाढ लक्षात घेता २७ लाख नोंदित आणि कुशल बांधकाम कामगारांची गरज भासणार आहे.बांधकाम कामगार, सुरक्षारक्षकांची नोंदणीबांधकाम कामगार आणि सुरक्षारक्षकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिकांना कौशल्याचे धडे देण्याबरोबरच त्यांना प्रमाणपत्रही दिले जाईल. राज्यात ११ लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली असून, नजीकच्या काळात १७ लाख कामगारांच्या नोंदणीचे उद्दिष्ट आहे. राज्यात अंदाजे २० लाख सुरक्षा रक्षक आहेत. त्या पैकी ३६ हजार जणांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे त्यांना आरोग्य, मुलांचे शिक्षण अशा विविध योजनांचा लाभ देणे शक्य होईल. कामगार नोंदणीसाठी ४० विशेष केंद्रे स्थापन करणार असल्याचे निलंगेकर म्हणाले.

टॅग्स :Homeघर