कोथरूड : काल काही निराळेच घडले, स्वप्नात माङया बाबा आले.. जुन्या पिढीपुढे नव्या पिढीची अशीच होते शरणागती., दीपोत्सव हा आला पाहा.. दोनच अक्षरे केवळ तरी विश्व व्यापुनी जाती.. यासारख्या मनाला भावणा:या कवितांचे नाटय़रूपांतर करून लहानग्यांनी उपस्थितांची दाद मिळविली.
निमित्त होते, डॉ. ज्योती रहाळकरलिखित ‘आम्ही मैत्रिणी’ या कवितांच्या नाटय़रूपांतर कार्यक्रमाचे. बालदिनाचे औचित्य साधून ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतील सातवीतील शर्वरी पाटबडकर, सई कामत, वैष्णवी नातू, अरुजा रहाळकर, ऋता डिके, आकांक्षा पानसरे, अनुष्का जोशी, गायत्री साने, जुई चंद्रचूड या विद्यार्थिनींनी विविध विषयांवर आधारित कविता अभिनयातून सादर केल्या.
नेहमी कविता वाचून कवितांचे सादरीकरण केले जाते; परंतु या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी प्रथमच कवितांमधून अभिनयाची सांगड घातली व प्रेक्षकांची मने जिंकली. मैत्री, स्त्रीभ्रूणहत्या निसर्ग, देव, आई, वडील, जनरेशन गॅप, कॉरपोरेट लाईफस्टाईल, दिवाळी, मन, सहकार, पोर्णिमेचा चंद्र यासारख्या वेगळ्या विषयांवर प्रथमच कविता सादर केल्या. डॉ ज्योती रहाळकर यांनी सूत्रसंचालन केले. धनश्री गणात्र यांनी कार्यक्रमाला संगीत दिले. (प्रतिनिधी)
नाटय़मय सादरीकरण करणो अवघड
4कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त भाव कवितांच्या माध्यमांतून डोळ्यांसमोर ठेवता येतात. लहानपणापासूनच जर कविता पाठांतराची आवड मुलांमध्ये बिंबवली, तर त्याची गोडी वाढत जाते. कवितावाचन सोपे आहे; परंतु त्या पाठ करून त्यांचे नाटय़मय पद्धतीने सादरीकरण करणो अवघड आहे, अशा भावना डॉ. रहाळकर यांनी या वेळी व्यक्त केल्या.
सामाजिक विषयांवर भर
4कधी उघडतील गंजलेल्या या बंद मनाची दारे, कधी घेतील स्त्री गर्भाकुर श्वास मोकळे. या कवितेतून स्त्रीभ्रूणहत्येसारख्या सामाजिक विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. स्त्रीभ्रूणहत्येचे वाढते प्रमाण व त्यावर कसा र्निबध घालता येईल, हे या कवितेतून प्रक्षेकांसमोर मांडण्यात आले. हृदयाला स्पर्श करेल, अशा प्रकारे या कवितेचे सादरीकरण मुलींनी केले.