शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नाटक मनोरंजन नव्हे संवर्धनाचा भाग : ज्योती सुभाष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 19:23 IST

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात अतुल पेठे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, नाटककार आशुतोष पोतदार, रंगकर्मी रवींद्र सातपुते आणि अमर देवगावकर हे सहभागी झाले होते.‘

पुणे : रंगभूमी हा आपल्या जगण्याचा एक भाग आहे. त्यातून व्यावसायिक अभिनेते निर्माण होतात हे तर खरे आहे. पण त्यामार्गे आपण संवेदनशील माणूस बनतो हे अधिक महत्त्वाचे आहे. मात्र, आज ‘आपल्याला नाटक अंतर्मनातून जवळचे वाटते का?’ असा प्रश्न पडायला हवा. नाटक म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे. तो आपल्या संवर्धनाचाच एक भाग आहे,असे मत ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी व्यक्त केले. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात अतुल पेठे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, नाटककार आशुतोष पोतदार, रंगकर्मी रवींद्र सातपुते आणि अमर देवगावकर हे सहभागी झाले होते.‘नाट्य असावे की नसावे’ आणि 'नवीन रंगकर्मींसमोरील अडचणी आणि उपाययोजना’ याविषयांवर सहभागींनी  आपआपले विचार व्यक्त केले. ज्योती सुभाष म्हणाल्या, ‘केवळ नाटक किंवा सिनेमात जाणे म्हणजे प्रशिक्षण नव्हे. चांगला माणूस होण्यासाठीसुद्धा प्रशिक्षण गरजेचे असते. त्यातून आपले व्यक्तिमत्त्व विकसित होते. आज प्रत्येकालाच टीव्हीवर काम करायचे आहे; पण अशा हव्यासापोटी प्रशिक्षणाकडे पाहू नका. पालकांनीही आपल्या मुलांबद्दल फार रोमँटिक कल्पना ठेवून याक्षेत्राकडे पाहू नये.’‘नाट्यप्रशिक्षण म्हणजे केवळ अभिनयाचे शिक्षण नव्हे. त्यात इतरही अनेक गोष्टी असणे गरजेचे आहे. अतुल पेठे  म्हणाले, दुर्दैवाने आज नाटक म्हणजे केवळ अभिनय असेच समीकरण आपण घेऊन बसलो आहोत. आजच्या महाराष्ट्रात नवे नाट्यलेखक कुठे आहेत? नवे दिग्दर्शक कुठे आहेत? आज महाराष्ट्रात नवे, तरुण संगीत-दिग्दर्शक तरी कुठे आहेत? केवळ अभिनेते म्हणजे नाटक कसे म्हणता येईल? आज मराठी नाटकात नवी फळी तयार होण्यासाठी देखील स्वतंत्र प्रशिक्षणाची गरज आहे. प्रशिक्षण म्हणजे ‘पी हळद अन हो गोरी’ नव्हे! बालपणी नाटक पाहण्यातून खरे नाट्यशिक्षण सुरू होते; पण नाटक करायचे असेल, तर नाटक सतत पाहणे आवश्यक आहे. प्रशिक्षणात नाटकाकडे पाहण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोन विकसित केला जातो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सातपुते म्हणाले, प्रशिक्षण घेतले म्हणजे आपण अभिनेता झालो असे नाही. खरे नाटक स्पर्धा आणि बक्षिसे यांच्यापलीकडे असते. ‘पुरुषोत्तम’ आणि ‘फिरोदिया’च्या पलीकडे जाऊन स्वत:चा आणि स्वत:च्या नाटकाचा शोध आपण घेतला पाहिजे.पोतदार म्हणाले, ‘नाट्यप्रशिक्षण कसे असावे, यावर अधिक विचार व्हायला हवा; शिवाय आजच्या युवकांना नाटकातून जगण्याचे स्रोतही शोधता यावेत, ही गरज आहे.  

टॅग्स :PuneपुणेAtul Petheअतुल पेठे