शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

सर परशुरामभाऊ महाविद्याालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय देव यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 19:37 IST

ज्येष्ठ साहित्यिक  गो. नी. दांडेकर यांचे जावई आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे ते वडील होत...

ठळक मुद्देराज्यशास्त्राचे विद्याार्थीप्रिय प्राध्यापक, लेखक म्हणून डॉ देव परिचित

पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्याालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय प्रल्हाद देव (वय ७८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी लेखिका डॉ. वीणा देव, दोन मुली, जावई आणि नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ साहित्यिक  गो. नी. दांडेकर यांचे जावई आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे ते वडील होत. विजय देव यांच्या अंतिम इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यशास्त्राचे विद्याार्थीप्रिय प्राध्यापक, लेखक म्हणून डॉ देव परिचित होते. स. प. महाविद्याालयात राज्यशास्त्र विषयाचे ३५ वर्षे अध्यापन केले. दोन वर्षे प्राचार्यपद भूषवून ते निवृत्त झाले. १९६६ पासून ते स.प.महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन करत होते. राज्यशास्त्र विभागप्रमुख, पदव्युत्तर राज्यशास्त्र केंद्रप्रमुख, स्पर्धा परीक्षा केंद्राचे संयोजक अशा विविध जबाबदा-या त्यांनी सांभाळल्या. पुणे विद्यापीठ तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठात त्यांनी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य, विद्याशाखेचे सदस्य, सिनेट सदस्य अशी विविध पदे भुषवली.राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, दुर्गसंपदा अशा विविध विषयांवर त्यांनी लेखन केले. गोनीदांच्या विविध साहित्यकृतींच्या अभिवाचनाची संस्कृती त्यांनी रूजविली. गोनिदा दुर्गप्रेमी मंडळाचे ते संस्थापक-अध्यक्ष होते. या मंडळातर्फे दरवर्षी दुर्ग साहित्य संमेलनासह दुर्ग जागरणाचे विविध उपक्रम त्यांनी राबविले. मृण्मयी प्रकाशन संस्थेचे ते संचालक होते. राज्यशास्त्र अभ्यास मंडळ, विद्वत सभा, सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठाच्या अधिसभेचे ते सदस्य होते.  राजकीय सिध्दांत, राजकीय विचारप्रणाली आणि राजकीय समाजशास्त्र हे प्रा. देव यांच्या अध्यापनाचे आवडते विषय होते. कौटिल्य आणि मॅकियाव्हेली यांच्या राजकीय संकल्पनांचा अभ्यास करुन प्रा. देव यांनी १९८३ मध्ये पीएचडी पदवी संपादन केली. राजकीय विश्लेषण कोशामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. 

----------विजय देव यांनी आयुष्यभर सरस्वतीची सेवा केली. सरस्वतीच्या ओंजळीतील फूल गळून पडले आहे. विद्येची संपत्ती दान करणाºया देव यांना विद्याार्थ्यांचे प्रेम मिळाले. त्यांचे हसतमुख असे दर्शन आता घडणार नाही.- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 

टॅग्स :PuneपुणेVeena Devवीणा देवMrinal Kulkarniमृणाल कुलकर्णीBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरे