शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. कलाम यांची विनम्रता सर्वश्रेष्ठ : सुरेश नाईक; ‘असे घडले डॉ. कलाम’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 12:17 IST

इस्त्रोचे माजी संचालक सुरेश नाईक यांनी अनेक रोमांचकारी व अनुकरणीय प्रसंगांतून ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे कलाम यांच्या यशार्थ जीवनाचे रहस्य विद्यार्थ्यांसमोर उलगडले. 

ठळक मुद्देकलामांच्या अंगी असलेले विनम्रता, साधेपणा हे गुण वाखाणण्याजोगे : सुरेश नाईक ‘असे घडले डॉ. कलाम’, दीपक चैतन्य लिखित ‘पिंट्यांची धमाल गाणी’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : ‘‘क्षेपणास्त्रांच्या निर्मितीपासून ते चाचणी यशस्वी होईपर्यंत कलामांना विविध प्रकारची अग्निदिव्ये पार करावी लागत असत. त्या काळात ते अहोरात्र आपल्या कामात मग्न असायचे. तसेच काही वेळा त्यांना वरिष्ठांच्या रागालाही सामोरे जावे लागे. परंतु, त्यांच्याकडे एक विलक्षण गुण होता, जो त्यांच्या यशाचे गमक आहे.’’ इस्त्रोचे माजी संचालक सुरेश नाईक यांनी अनेक रोमांचकारी व अनुकरणीय प्रसंगांतून ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे कलाम यांच्या यशार्थ जीवनाचे रहस्य विद्यार्थ्यांसमोर उलगडले. डॉ. नंदा हरम लिखित आणि विद्यानंद प्रकाशनच्या ‘असे घडले डॉ. कलाम’ आणि दीपक चैतन्य लिखित ‘पिंट्यांची धमाल गाणी’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन नाईक यांच्या हस्ते औंधच्या सिंध विद्या भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कलामांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांतून त्यांच्या सर्वश्रेष्ठ आदरयुक्त व्यक्तित्वाचे दर्शन घडविले. या वेळी कर्नल विक्रम अडवाणी, गौतम फेरवानी, डेक्कन कॉलेजच्या डिक्शनरीचे संपादक डॉ. प्रसाद जोशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे  प्रमुख डॉ. रवींद्र मुळे, लायन्स क्लब कोथरूडचे अध्यक्ष नागेश चव्हाण, अ‍ॅस्कॉपचे अध्यक्ष डॉ. आर. टी. वझरकर तसेच विद्यानंद प्रकाशनचे किशोर खुर्जेकर उपस्थित होते. नाईक म्हणाले, की कॉलेजमध्ये प्रोजेक्टसाठी गाईडने दिलेली तीन दिवसांची मुदत पूर्ण करताना कलामांनी घेतलेली दिवसरात्र मेहनत, त्यातून शिकलेला वेळेच्या नियोजनाचा धडा, एसएलव्ही ३ या संपूर्ण देशी बनावटीच्या रॉकेटच्या अपयशानंतर उठलेली टीकेची झोड ही अत्यंत विनम्रतेने स्वीकारत पुढील वर्षी दमदार यशस्वी चाचणी करून दाखवली. त्यांचे संघटनकौशल्य, नेतृत्व, लहान मोठ्यांना समजून घेण्याची वृत्ती, समजावण्याची पद्धत समोरच्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पाडणारी व एक मित्रत्वाचे नाते निर्माण करणारी अशी होती. संध्या शेवडे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.  

दहा वर्षांचा कामाचा अनुभव अविस्मरणीय कलाम शाळेत असताना पक्ष्यांच्या उड्डाणाविषयी त्यांना अय्यर सर शिकवत होते. छोट्या अब्दुल्लच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव ओळखत अय्यर सरांनी सर्व विद्यार्थ्यांनाच समुद्रकिनारी नेत, पक्ष्यांचे उड्डाण कसे होते, उडताना दिशा कशा बदलतात, याविषयीची सविस्तर माहिती प्रात्यक्षिकासह दिली. या प्रसंगानंतर त्यांनी जीवनात विज्ञानाच्या क्षेत्रातच काम करायचे, असे ठरवले. हा प्रसंग त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. दहा वर्षांचा त्यांच्या कामाचा अनुभव अविस्मरणीय असा होता. कलामांच्या अंगी असलेले विनम्रता, साधेपणा हे गुण वाखाणण्याजोगे होते. अशा विविध प्रसंगांतून कलामांची स्वभाववैशिष्ट्ये सांगितली.

टॅग्स :isroइस्रोPuneपुणे