शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: नागोरी, खंडेलवालचा क्लोजर रिपोर्ट प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 02:46 IST

दोघांनाही या प्रकरणात डिसेंबर २०१३मध्ये अटक करण्यात आली होती.

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरखूनप्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आलेले आरोपी मनीष नागोरी व विकास खंडेलवाल यांच्याविरुद्ध न्यायालयात दाखल करण्यात आलेला खटला बंद करण्यात यावा, यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर अद्याप काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.दोघांनाही या प्रकरणात डिसेंबर २०१३मध्ये अटक करण्यात आली होती. तपासात काही ठोस पुरावे न मिळाल्याने या प्रकरणी ९० दिवसांत दोषारोपत्र दाखल झाले नव्हते. त्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी खटला बंद करण्यासंदर्भातील अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयात सादर करावा, असा विनंतीअर्ज आरोपींचे वकील अ‍ॅड. बी. ए. अलूर यांनी सहा महिन्यांपूर्वी दाखल केला होता.या संदर्भात तपास अधिकारी व सरकारी वकिलांनी त्यांचे म्हणणे न्यायालयासमोर मांडावे, असे आदेश त्या वेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे-पाटील यांनी दिले होते. मात्र, अद्याप त्याबाबत काही निर्णय झालेला नाही. नागोरी याने अनेकांना बेकायदेशीररीत्या देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री केली होती. डॉ. दाभोलकर यांचा खून करणाऱ्यांनादेखील पिस्तुलाची विक्री केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. नागोरी व खंडेलवाल यांना पुणे विद्यापीठाच्या आवारात रखवालदाराच्या खूनप्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणारा आरोपी पकडण्यात आल्याचा दावा सध्या सीबीआय करीत आहेत. या प्रकरणात नागोरी आणि खंडेलवाल यांचा काही सहभाग नसल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमीवर, क्लोजर रिपोर्ट सादर करणे अपेक्षित आहे.नुकसानभरपाईचा दावा करणारनागोरी आणि खंडेलवाल यांचा डॉ. दाभोलकर खूनप्रकरणात थेट सहभाग नसल्याचे ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत; त्यामुळे दोघांचा या प्रकरणात काय रोल होता, हे स्पष्ट झालेले नाही.असे असतानाही त्यांना अटक करण्यात आली होती; त्यामुळे या प्रकरणी झालेल्या मनस्तापाबाबत नुकसानभरपाई मिळावी म्हणून उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार आहे, असे अ‍ॅड. अलूर यांनी सांगितेल.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरMurderखून