शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या डायरीत ३६ जण हिटलिस्टवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 07:18 IST

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : दोषारोपपत्रासाठी मुदतवाढीची मागणी

पुणे : गौरी लंकेश हत्याप्रकरणात एसआयटीने अमोल काळेला अटक केली आहे. त्याच्याकडे एक डायरी मिळाली असून, त्यात ३६ जणांची नावे असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना मारण्याचा कट होता. त्यांना नुकतेच पोलीस संरक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती गुरुवारी सीबीआयचे वकील पी. राजू यांनी न्यायालयास दिली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात त्यांच्यावर बेकायदा हालचाली प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दोषारोपत्र सादर करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अ‍ॅड. राजू यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्याकडे केली. याप्रकरणातील अटक आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे यांचे काही ई-मेल मिळाले असून, फरार असलेला आरोपी सारंग अकोलकर याच्यांशी त्याने संवाद केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींनी मोठा कट रचला असून त्यासाठी त्यांनी पूर्वतयारी केली आहे, असा युक्तिवाद अ‍ॅड. राजू यांनी केली

अंदुरेतर्फे अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी बाजू मांडली. दाभोलकर हत्या प्रकरणात विनय पवार आणि सारंग अकोलकर मारेकरी असल्याचे सीबीआयने सांगितले. अंदुरे आधीच अटकेत असून त्याच्याविरोधात पुरावे नाहीत.आणखी ९० दिवस त्याला अटकेत ठेवणे त्याच्यावर अन्याय आहे. तपास यंत्रणांनी काय प्रगती झाली याची कारणे सांगणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद पुनावळेकर यांनी केला. याप्रकरणाची सुनावणी आज होईल.आरएसएसचे नाव घेतले जात नाहीगौरी लंकेश प्रकरणात तपासात ज्या बारा लोकांना अटक केली आहे. त्यातील सहा जणांनी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचे जबाब दिले आहेत. मात्र, जाणीवपूर्वक ते संघाचे असल्याचे सांगितले जात नाही. सीबीआय सनातन, हिंदू जनजागृती समितीचे नाव घेते. मात्र, आरएसएसचे नाव घेतले जात नाही, असे अ‍ॅड. पुनावळेकर यांनी न्यायालयात सांगितले.शरद कळसकर व्हीसीद्वारे हजर : याप्रकरणातील आरोपी शरद कळसकरला मुंबई कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे (व्हीसी) हजर करण्यात आले. त्याला न्यायाधीशांनी काय सुनावणी सुरू आहे. त्याची बाजू कोण मांडणार आहे, याची माहिती दिली. कळसकरतर्फे त्याचे वकील अ‍ॅड. धर्मराज चंडेल शुक्रवारी बाजू मांडणार आहेत.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरGauri Lankeshगौरी लंकेशMurderखून