शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

महिनाभर दांडी, तरी ‘फुलपगारी’

By admin | Updated: March 20, 2015 00:57 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या डेपोमधील बसच्या सुरक्षेसाठी खासगी रखवालदारांची नेमणूक केली आहे.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या डेपोमधील बसच्या सुरक्षेसाठी खासगी रखवालदारांची नेमणूक केली आहे. परंतु, त्यांचे रखवालदार महिनोन्महिने गैरहजर राहून पूर्ण पगार घेत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीकर परदेशी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, ते आता काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.मार्केड यार्ड डेपोतून नुकतीच एक बस चोरीला गेल्याचा प्रकार उजेडात आला. त्यामुळे बस डेपोच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच खासगी रखवालदारांचा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. राजीव युवा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष हृषीकेश बालगुडे यांना मिळालेल्या माहितीतून हा प्रकार समोर आला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये १० बस डेपो आहेत. रात्रीच्या वेळी या ठिकाणी बस उभ्या केल्या जातात. बस लावण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने डेपोच्या परिसरात ररस्त्यांवरच बस लावल्या जातात. या बसच्या सुरक्षिततेसाठी रखवालदार पुरविण्याचा ठेका रक्षक ग्रुपला देण्यात आला आहे. करारानुसार रक्षक ग्रुपला ८ ते ९ लाख रुपये पीएमपी प्रशासनाकडून दिले जातात.रक्षक ग्रुपचे रखवालदार बहुतांश वेळा कामावर हजर राहात नाहीत. ते पूर्ण महिनाभर गैरहजर असल्याची नोंद पीएमपीकडील हजेरी पुस्तकामध्ये असतानाही त्यांचे संपूर्ण वेतन अदा करण्यात आल्याची कागदपत्रे बालगुडे यांनी श्रीकर परदेशी यांच्याकडे सादर केली आहेत. उदारणादाखल त्यांनी गौतम साळवे या रखवालदाराचे हजेरी पुस्तक व त्याला पगार अदा केल्याचे पुरावे सादर केले आहेत. पीएमपी गाडी रुळावर आणण्यासाठी परदेशी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात असताना, त्यांनी या प्रकाराचाही बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. पीएमपीच्या रखवालदार पुरविण्यातील भ्रष्टाचारात सुरक्षा विभाग, आॅडिट विभाग व अन्य विभागातील अधिकारी सहभागी आहेत. त्यांच्या संगनमताशिवाय हा गैरव्यवहार करता येणे शक्य नाही. त्यामुळे संबंधितांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी बालगुडे यांनी केली आहे.