शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुळशी तालुक्यातील कोराईगडावरील चोर दरवाजा खुला : दुर्गसेवकांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 14:19 IST

लोणावळा, खंडाळ्यासह मावळात पावसाळ्यात पर्यटकांची संख्या अफाट असते.

ठळक मुद्देबंद असलेला मार्ग मातीचा ढिगारा उपसून केला मोकळा 

कामशेत : सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्या मावळ विभागाच्या वतीने रविवारी लोणावळ्याजवळील व मुळशी तालुक्यातील कोरीगड किल्ल्यावर दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. या वेळी किल्ल्यावरील गणेश दरवाजाजवळ गडाचे व साहित्याचे पूजन करून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. मातीत गाडला गेलेला एक चोर दरवाजा दुर्गसेवकांनी मातीचा ढिगारा उपसून खुला केला.लोणावळा, खंडाळ्यासह मावळात पावसाळ्यात पर्यटकांची संख्या अफाट असते. वर्षाविहाराचा आनंद घेतानाच मावळातील ऐतिहासिक व प्राचीन वास्तूंनाही पर्यटक भेट देत असतात. मावळ तालुका पर्यटनाच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत विकसित होत असून, स्थानिकांना रोजगार मिळत आहे. त्यात शिवरायांच्या गडकिल्ल्यांना पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी अनेक दुर्गसंवर्धन संस्था, दुर्गसेवक, स्थानिक व पर्यटक कार्यरत आहेत. यातूनच अनेक गड-किल्ल्यांवर अनेक कामे झाली आहेत आणि होत आहेत. शिवकालातील पौड, मावळात असलेला कोराईगड हा गिरिदुर्ग आजच्या बोरघाटाच्या दक्षिणेस ३३ किलोमीटर अंतरावर आणि पुण्याच्या पश्चिमेस ६७ किलोमीटर अंतरावर आहे. पुणे व रायगड या जिल्ह्यांच्या सीमेवर तो आहे. शिवपूर्व काळापासून या किल्ल्याला फार महत्त्व प्राप्त झाले असून, पौड-मावळातील आंबे अथवा आंबवणी घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा भाग मानला जात असे. .............प्रतिष्ठानच्या या मोहिमेदरम्यान किल्ल्याच्या मागच्या म्हणजेच सहारा सिटीच्या बाजूला असणाऱ्या बुरुजाच्या खालच्या टप्प्यात असलेल्या तीन चोर दरवाजांपैकी एक दरवाजा जो पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्यात दिसेनासा झाला होता तो मोकळा करण्यात आला. या तीन दरवाजांपैकी एक दरवाजा पूर्वीपासून मोकळा आहे. तर दोन दरवाजे हे पूर्णपणे बुजले गेले होते. त्यातील एक दरवाजा या मोहिमेत मोकळा करण्यात आता. या मोहिमेत विविध ठिकाणचे दुर्गसेवक सहभागी झाले होते.   

टॅग्स :kamshetकामशेतFortगडhistoryइतिहास