शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जात, भावकीसाठी मत वाया घालवू नका,विकास करणाऱ्याच्या मागे उभे राहा: भास्करराव पेरे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 13:11 IST

जात-भावकीसाठी मत वाया घालवून येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य कोणाच्याही दावणीला बांधू नका..

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यामध्ये ७४८ ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर

रविकिरण सासवडे- बारामती: ग्रामपंचायत निवडणुका भावकी, जात, धर्म यांच्या आधार घेऊन होऊ नयेत. आरोग्य, व्यसनाधीनता, रोजगार आणि गावाचा सर्वार्थाने विकास करणाऱ्याच्या मागे उभे राहा. जात-भावकीसाठी मत वाया घालवून येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य कोणाच्याही दावणीला बांधू नका, असे आवाहन पाटोदाचे (जि. औरंगाबाद) आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये ७४८ ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. गावागावामध्ये निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. तर काही ठिकाणी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधी व गाव पुढारी प्रयत्न करतानाचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांच्याशी संवाद साधला.

पेरे-पाटील म्हणाले, आईला गर्भ राहिल्यापासून ते मनुष्याच्या मरणापर्यंत ग्रामपंचायत वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसाठी काम करीत असते. सेवा-सुविधा पुरवित असते. गावकी-भावकीच्या राजकारणात आपण आपले भविष्य पुसून टाकत आहोत. राज्य शासन, केंद्र शासनाच्या ग्रामपंचायतीसाठी शेकडोने योजना आहेत. मात्र यामधील किती योजना आपल्याला माहिती आहेत. जात, धर्म यामधून जे सामाजिक प्रश्न उभे राहिले आहेत. ते आपण अजून मिटवू शकलो नाही. ते प्रश्न जैसे थे असताना दररोज नवनवीन सामाजिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. 

प्रदुषण, वृक्षसंवर्धन, जलसंधारण, वीज, शेतमाल प्रक्रिया, रोजगार, आरोग्य, महिला सबलीकरण अशा अनेक विषयांवर काम करण्याची गरज आहे. गावच्या भल्यासाठी चार माणसे बसून गावातील अंतर्गत विरोध मिटवत असतील व ग्रामपंचायत बिनविरोध होत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे. मात्र पैशाचे अमिष दाखवून कोणी ग्रामपंचायत बिनविरोध करू पाहत असेल तर निवडणुक व्हायला हवी. ही  निवडणुक निकोप असावी. गावाच्या भल्यासाठी कोणी झटू पाहत असेलत तर  अशा होतकरू व्यक्तीला जात, भावकी, धर्म विसरून ग्रामस्थांनी साथ द्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले आहे. ..... 

चांगले काम करणाऱ्याला संधी द्या : पोपटराव पवारगावासाठी चांगले काम उभे करणाऱ्यांना आज खूप संधी उपलब्ध आहेत. आम्ही जेंव्हा हिरवे बाजारसाठी काम करायला लागलो तेंव्हा जास्त निधी नव्हता. आज राज्य शासन, केंद्र शासन,  उद्योगांमधून मिळणारे सिएसआर फंड यामधून भरपूर निधी गावासाठी उपलब्ध आहेत. मात्र पोटतिडकीने काम करणाऱ्याला गावाने संधी द्यायला हवी, असे मत हिवरे बाजारचे (जि. अहमदनगर) आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील तरूण आज महापुरूषांच्या जयंती-पुण्यातिथी, लग्न समारंभ आणि निवडणुका याची वाट पाहत असतात. एकतर यामधून पैसा, व्यसन आणि छानपैकी याची गरज भागली जाते. या तरूणांचा वापर करून अवैध धंदे वाढवले जातात. अवैध धंद्यातून पैसा, पैशातून राजकारण आणि त्यातून वाद-संघर्ष असे सुत्र अनेक गावात दिसून येते. त्यामुळे मतदारांनी देखील आपले गाव कोण आदर्श बनवू शकेल अशाच व्यक्तीला गाव कारभारी म्हणून निवडले पाहिजे.------------------------------

टॅग्स :BaramatiबारामतीElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचPoliticsराजकारणVotingमतदान