शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 : उद्धव ठाकरेंना सिरीयसली घेऊ नका ; बाळासाहेब थोरात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 21:20 IST

ओबीसी समाजाकरिता मोठे काम केंद्र सरकारने केल्याचे गृहमंत्री अमित शहा सांगत आहेत, परंतू कोणते काम केले याचा ते उल्लेख करीत नाहीत़.  पुणे शहर हे स्मार्ट सिटी म्हणून घोषित केले. परंतू एकही प्रकल्प त्यांनी गेल्या पाच वर्षात पूर्ण केलेला नाही़, अनेक प्रकल्प रेंगाळलेले आहेत़ राज्य सरकारचे हे अपयश घेऊनच आम्ही जनतेसमोर जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले़.  

पुणे : माझ्या मतदारसंघात आले म्हणजे त्यांना काहीतरी बोलणं भाग आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जास्त सिरियसली घेऊ नका असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात व्यक्त केले. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते़. बुधवारी थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी 'थोरात यांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. ते थोरात तर आम्ही जोरात' असेही ते म्हणाले. त्यावर उत्तर देताना थोरात म्हणाले की, 'मतदारसंघात आल्यावर त्यांना काहीतरी बोलणे भाग आहे. तुम्ही काय त्यांना  सिरीयस घेऊ नका'. 

 ते म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नसून, विधानसभा निवडणुकीला आम्ही दोन्ही पक्ष आघाडी म्हणून सामोरे जात आहोत़. निवडणुक प्रचाराला आत्ताच कुठे सुरूवात झाली आहे़ आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवर सर्व नेते येणार असून, या निवडणुकीत आम्ही १६० पेक्षा अधिक जागा मिळवून विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़.       राज्य सरकारने पुर परिस्थितीच्या काळात अतिशय निराशाजनक काम केले असून, केंद्र सरकारकडून ६ हजार ८०० कोटी रूपयांची मदत मिळाली असे सांगितले आहे़, मात्र यापैकी एक पैसाही राज्याला केंद्राने दिलेला नाही़. निवडणुकीच्या धामधुमीत व भाजपातील महाभरतीत सरकार पुरग्रस्तांना विसरले आहे़.

 ओबीसी समाजाकरिता मोठे काम केंद्र सरकारने केल्याचे गृहमंत्री अमित शहा सांगत आहेत, परंतू कोणते काम केले याचा ते उल्लेख करीत नाहीत़.  पुणे शहर हे स्मार्ट सिटी म्हणून घोषित केले. परंतू एकही प्रकल्प त्यांनी गेल्या पाच वर्षात पूर्ण केलेला नाही़, अनेक प्रकल्प रेंगाळलेले आहेत़ राज्य सरकारचे हे अपयश घेऊनच आम्ही जनतेसमोर जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले़.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरातPoliticsराजकारण