शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जम्बो अन् वाद काय थांबेच ना! आयसीयूतील काही डॉक्टरांनी मांडले थेट अजित पवारांकडे गाऱ्हाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 14:58 IST

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अतिजलद गतीने तयार करण्यात आलेले जम्बो रुग्णालय पहिल्या दिवसापासून वादात सापडले आहे

पुणे : कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अतिजलद गतीने व गाजावाजा करत तयार करण्यात आलेले जम्बो रुग्णालय पहिल्या दिवसापासून वादात सापडले आहे. जणू जम्बो आणि वाद हे समीकरणच तयार झाले आहे. आताही जम्बो सुरू होऊन आठ दिवस उलटत नाही तोच नवा वाद उफाळून आला आहे. व यासंबंधी अतिदक्षता विभागातील ४ डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी थेट बारामती गाठली. 

मात्र, त्यांची भेट न झाल्यामुळे पत्राद्वारे तक्रारींचा पाढाच वाचला असून काही मागण्या देखील केल्या आहेत.

राज्यात कोरोना संकट गडद होत आहे.पुण्यात दिवसागणिक वाढत आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने प्रशासन, पुणेकर अशा सर्वांचीच धाबे दणाणले आहे.त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवाजीनगर येथे असलेले जम्बो पुन्हा एकदा सुरू करण्यात आले. मात्र जम्बोतील ४ डॉक्टरांनी थेट उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडे जम्बोतील सध्याच्या वैद्यकीय सुविधांमधील त्रुटींविषयी पत्राद्वारे गाऱ्हाणे मांडले आहे.

डॉक्टर पत्रात म्हणतात, कोविडची आताची लाट पहिल्या पेक्षाही फार भयंकर आहे. सध्याच्या परिस्थितीत रुग्णांना अतिदक्षता विभागातील बेड्स उपलब्ध होण्यात खूप अडचणी येत आहे. तसेच पुन्हा सुरू करण्यात आलेले जम्बो झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या सेवेत कमी पडत आहे.  त्यात भर म्हणजे अतिदक्षता विभागात अननुभवी डॉक्टरांची भरती करण्यात आली असून तेथील मृत्युदर वाढला आहे.मात्र, अशा परिस्थितीत पहिले ५ महिने इथे कामाचा अनुभव असलेल्या डॉक्टरांची पुन्हा भरती करण्यात यावी. मात्र पहिल्या ५ महिने काम केलेल्या डॉक्टरांचे पगार थकीत आहे. त्यामुळे तिथे डॉक्टर आणि नरसिंग स्टाफ काम करण्यास तयार नाही. परंतू, आता आयसीयू मध्ये पुन्हा जुन्या डॉक्टरांची भरती करून त्यांचे वेतन थेट महापालिकेद्वारे करण्यात यावे असाही उल्लेख पत्रात अतिदक्षता विभागातील डॉक्टरांनी केला आहे.

या संदर्भात जम्बो प्रशासनाशी संपर्क साधला असता अधिष्ठाता (डीन ) डॉ. श्रीयांश कपाले म्हणाले, सर्व लोकांचे पगार करण्यात आले आहेत. काही संस्था वगळता सर्वांची बिल देखील देण्यात आली आहेत. या पत्रात कोणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पत्रावरची सही देखील संशयास्पद वाटत आहे. पगारावरुन चर्चा केली जात असतेच. सध्या जम्बो मध्ये ५०० रुग्णांने पुरेसा होईल इतका स्टाफ आहे. या जम्बोला बदनाम करण्याचा प्रयत्न दिसत आहे. जम्बो कोविड रुग्णालयाच्या प्रशासनाशी कोणीही याबाबत संपर्क साधलेला नाही. या संपूर्ण प्रकाराबाबत आम्ही पोलिस तक्रार करत आहेत. तसेच तपास देखील करण्यात येईल.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका