गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत सचिन पाटील बोलत होते. या वेळी पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी, पोलिस पाटील जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल खोपडे,पो.पा.वैशाली जगताप, प्रीती कांबळे,पो. ह.भगीरथ घुले, युवराज धोंडे,गणेश मंडळांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले की, गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक शिबिरे, उपक्रम राबवावेत. बिभत्स गाणी लावू नयेत, श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, श्री गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन किंवा केबल नेटवर्क वरून करावे, रोडरोमियोंविरुद्ध कडक केली जाईल, वर्गणीची सक्ती करून शांतता भंग करू नका, मंडळासमोर स्त्रिया व मुलींची छेडछाड होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच फटाके वाजवू नयेत असे सूचित करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले.
०५ नसरापूर
बैठकीत मार्गदर्शन करताना सचिन पाटील व्यासपीठावर पोलीस निरीक्षक सचिन पाटील व इतर.
050921\img-20210831-wa0027.jpg
सोबत फोटो व ओळ : नसरापूर(ता.भोर)येथे राजगड पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत मार्गदर्शन करताना भोरचे तहसीलदार सचिन पाटील, पोलीस निरीक्षक सचिन पाटील आदी मान्यवर.