शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

आदेश असताना शरद पवारांचा फोटो वापरू नका; अन्यथा न्यायालयात पुरावे सादर करणार - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 12:56 IST

तुम्ही जिकडे गेला आहात त्यांचा फोटो लावा, शरद पवारांचा फोटो लावायचा नाही, सोयीप्रमाणे त्यांचा वापर केलेला मी खपवून घेणार नाही

राजुरी (जुन्नर) : शरद पवारांना सोडून तिकडे जाणाऱ्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायचं. अतिशय विनम्रपणे सांगते की, तुम्ही जिकडे गेला आहात त्यांचा फोटो लावा. शरद पवारांचा फोटो लावायचा नाही. सोयीप्रमाणे त्यांचा वापर केलेला मी खपवून घेणार नाही. न्यायालयाचे आदेश असतानाही शरद पवारांचा फोटो वापरल्याचे पुरावे न्यायालयात सादर करणार असल्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार अतुल बेनके यांना नाव न घेता दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचार दौऱ्यात राजुरी (ता.जुन्नर) येथे आयोजित सभेत सुप्रिया सुळे यांनी बेनके यांच्यावर टीका केली.

 सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कटेंगे तो बटेंगे अशा पद्धतीने हा देश चालणारा नाही, हा देश शाहू, फुले यांच्या विचाराने बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारा देश आहे. शरद पवार यांना या वयात काहीही नको आहे, ते कष्टकरी शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी लढत आहेत. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आल्यानंतर पाच वर्षांत महागाई स्थिर ठेवण्यात येईल, महिलांसाठी महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी ३ हजार रुपये देणार येणार. कुकडी प्रकल्पातील पाण्याच्या प्रश्नावरून राजकारण सुरू असल्याने सत्यशील शेरकर आमदार झाल्यावर जुन्नर ते उस्मानाबादपर्यंतच्या सर्व आमदारांची एकत्र बैठक घेऊन पाण्याचे सामान वाटप करू व पाण्याचा प्रश्न सोडविला जाईल. मतदारांनी महाविकास आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.शरद पवार यांच्या अडचणीच्या काळात जुन्नर तालुक्यातून शरद लेंडेसह जे उभे राहिले त्या सगळ्यांना शब्द देते, राज्यात आपली सत्ता आल्यानंतर मान आणि पहिलं सत्तेचं पद जुन्नर तालुक्याला दिले जाईल. हे रेकॉर्ड करून ठेवा, असे आश्वासन सुप्रिया सुळे जाहीर सभेत दिले. शिवसेना उपनेते बबन थोरात म्हणाले की, भाजप सरकारला शेतकऱ्यांशी काहीही घेणे देणे नाही, या सरकारने शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवायचे काम केले आहे. भाजप पक्षातील नेत्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे पक्ष फोडण्याचे काम केले आहे. अशा गद्दारांना धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले.

रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार

केंद्र शासनाच्या जीएमआरटी या अतिमहत्त्वाच्या प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यात रोजगार निर्मितीवर अतिशय मर्यादा येतात. त्यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी शासनाकडून भरीव निधी आणून मार्गदर्शन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तालुक्यात हिंजवडी आणि मगरपट्टा या आयटी पार्कच्या धर्तीवर खासगी आणि सरकारी गुंतवणूक आणून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे. शेतीमाल प्रक्रिया करून परदेशी पाठविण्यासाठी आणे पठारावर कार्गो हब उभारणार असून आदिवासी भागातील पाणी टंचाई सोडवण्यासाठी जलसाठे, धरणे आणि सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार व तालुक्यात युवकांसाठी क्रीडा धोरण आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याचे सत्यशील शेरकर यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारHigh Courtउच्च न्यायालय