शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शाळेच्या आवारात घुसुन पिसाळलेल्या कुत्र्याचा विद्यार्थी,नागरिकांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 16:31 IST

नऊ जणांना घेतला चावा..

ठळक मुद्दे बारामती शहरात अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट

बारामती : बारामती भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना मंगळवारी(दि. ५) शाळेच्या पहिला दिवस पिसाळलेल्या कुत्र्यांनी विद्यार्थी,नागरीकांना चावा घेतल्याने चचेर्चा ठरला.  शहरात सकाळ पासूनच पिसाळलेल्या कुत्र्यांनी वयस्कर तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसह ९ जणांना चावा घेतला आहे. पिसाळलेली कुत्री आक्रमक झाल्याचे चित्र आहे.बारामती शहरात अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी शहरातील नागरिकांनी बारामती नगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. शहरातील अनेक भागत चौकात ही धष्टपुष्ट कुत्री पसरलेली असतात. या बाबत बारामतीकरांना आंदोलन देखील करावे लागले आहे.त्याची दखल घेवुन नगरपरिषद प्रशासनाने भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहिम देखील हाती घेतली आहे.मात्र,मंगळवारी  सकाळ पासूनच शहरातील वेगवेगळ्या भागात पिसाळलेल्या कुत्र्याने नऊ जणांचा चावा घेतला आहे. भिगवण रस्त्यावरील मएसो शाळेमध्ये जेवणाची सुट्टी झाली होती.यावेळी शाळेच्या आवारात शिरुन कुत्र्याने एका विद्यार्थिनीच्या दंडाला चावा घेतला. चावा घेणाºया कुत्र्याला शाळेतील शिक्षक,पालकांनी विद्याथीर्नीपासुन दुर करण्याचा प्रयत्न केला.त्यासाठी  कुत्र्याला मारहाण देखील करण्यात आली.मात्र, पिसाळलेल्या कुत्र्याने  त्या विद्यार्थिनीला सोडले नसल्याचे,  प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच माळावरच्या देवीच्या मंदिराजवळ सेवानिवृत्त अनंत पाटील हे घरापाशी उभे होते. या पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या पायाला व हाताला चावा घेतला आहे.शिवाय मएसो शाळेचे सुरक्षा रक्षक दत्तात्रय शिंदे यांना या कुत्र्याने हाताला मोठा चावा घेतला .शहरातील प्रगतीनगर येथे दत्तात्रय भोसले हे मित्रांशी गप्पा मारत उभे असताना अचानक या पिसाळलेल्या कुत्र्याने मनगटाला पकडले.त्यांच्या मित्रांनी त्या कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न केला .मात्र ,त्याने भोसले यांच्या हात सोडला नाही ,असे भोसले यांनी सांगितले .त्यांच्या मनगटाला मोठी जखम झाली आहे. या सगळ्या प्रकरणात या पिसाळलेल्या कुत्र्याने उभ्या असणाºया आणि वयस्कर नऊ नागरिकांना निर्दयपणे चावा घेतला आहे.दिवसा ढवळ्या  पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपचारासाठी सिल्व्हर जुबाली हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. रात्रीच्या वेळी १५ ते २० च्या टोळक्याने ही कुत्री असतात .रात्रीच्या वेळी वयस्कर किंवा महिला यांच्यावर या भटक्या कुत्र्यांनी केलेला हल्ला  जीवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे. ३ - ४ दिवसांपासून या भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी बारामतीतील नेचर फ्रेंड्स आॅर्गनायझेशन या प्राणी मित्र संस्थेला जबाबदारी देण्यात आली आहे.———————————————या महिन्यात भटकी कुत्री चावल्याने  २०० रुग्ण ांना  इंजेक्शन देण्यात आली आहेत. ती आपल्याकडे उपलब्ध असतात.मात्र,  अँटी रेबीज सिरम या इंजेक्शनच्या तुटवडा आहे. बाहेरील तालुक्यातील रुग्ण देखील येत असल्याने आम्ही लस उपलब्ध ठेवत आहोत.डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय अधीक्षक, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय,बारामती———————————सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटल बारामतीबारामती शहरातील गाड्यांच्या मागे धावणारी मुलांच्या मागे धावणाºया ज्या भागातून तक्रार येत आहे.तेथील मागील १५ दिवसांपासून १०० भटकी कुत्री पकडून त्यांना शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर योग्य ठिकाणी सोडले आहे. नागरिकांनी रस्त्यावर कुत्री दिसल्यास घाबरून न जाता सावकाश गाडी चालवावी .तसेच एखादे कुत्रे पिसाळले आहे, असे वाटल्यास त्याची तक्रार बारामती नगर पालिकेकडे करावी.बबलू कांबळे, प्रमुख, नेचर फ्रेंड्स आॅर्गनायझेशन 

टॅग्स :Baramatiबारामतीdogकुत्राStudentविद्यार्थी