शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

युनिक आयडी देता का कुणी युनिक आयडी; दिव्यांगांचे ३१ हजार अर्ज प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 09:14 IST

दिव्यांगांचे ३१ हजार अर्ज अद्याप प्रलंबित

प्रज्वल रामटेकेलाेकमत न्यूज नेटवर्कपुणे : आगामी काळात दिव्यांग प्रमाणपत्राबरोबरच ‘युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड’ (यूडीआयडी) अर्थात युनिक ओळखपत्र असल्याशिवाय दिव्यांगांना कोणत्याही शासकीय सोयी-सुविधांचा तसेच सवलतींचा लाभ घेता येणार नाही. मात्र, हे युनिक ओळखपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांची परवड हाेत आहे. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आतापर्यंत १ लाख १९ हजार ६५ अर्ज आले असून, त्यापैकी ५९ हजार २४ जणांची प्रकरणे मंजूर झाली आहेत; परंतु त्यांना अद्याप यूडीआयडी कार्ड मिळालेले नाही, तर ३१ हजार ४४१ अर्ज अजूनही प्रलंबित आहेत.

फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने २०१२ साली ‘एसएडीएम’ ही संगणकीय प्रणाली विकसित केली. पुढे २०१८ पासून भारत सरकारच्या स्वावलंबन प्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येऊ लागले. यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्रासोबत ‘यूडीआयडी’ अर्थात वैश्विक कार्ड देण्यात येते.यापूर्वीच्या ‘एसएडीएम’ या संगणकीय प्रणालीद्वारे कायमस्वरूपी तसेच तीव्र स्वरूपातील दिव्यंगत्व असणाऱ्या दिव्यांगांनाही सुधारित प्रणालीद्वारे प्रमाणपत्रासाठी पुन्हा तपासणी करावी लागत असल्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्र वितरणातील अर्ज मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. 

दिव्यांग प्रमाणपत्र देणारी रुग्णालये : १३ nअर्ज प्राप्त : १ लाख १९ हजार ६५ nमंजूर अर्ज : ५९ हजार २४ पण कार्ड मिळालेले नाहीnप्रलंबित अर्ज : ३१ हजार ४४१ 

पूर्वीच्या एसएडीएम संगणकीय प्रणालीतील तीव्र व कायमस्वरूपी दिव्यंगत्व असणाऱ्या दिव्यांगांना स्वावलंबन प्रणालीतील प्रमाणपत्र व यूडीआयडी कार्ड मिळविण्यासाठी पुन्हा तपासणी न करता मिळावेत. दिव्यंगत्व प्रमाणपत्रासाठी दिलेल्या मुदतीमध्ये तपासणी करून प्रमाणपत्र मिळाली पाहिजेत. जिल्ह्यातील दिव्यांगांचे प्रवर्गनिहाय सर्वेक्षण आणि स्वावलंबन प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर केल्या पाहिजेत.- हरिदास शिंदे, अध्यक्ष, संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समिती, पुणे.

सिस्टीमच्या मर्यादा आहेत. दिवसाला १०० जणांनाच कार्ड देऊ शकताे. ज्यांना नंबर दिले आहेत ते लवकर येत नाहीत किंवा त्यांचा प्रतिसादही मिळत नाही. यामुळे यूडीआयडी कार्ड प्रलंबित राहतात, असे समाजकल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Puneपुणे