शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शाई फेकली म्हणून माणुस काय मरतो काय? ३०७ कलम लावणे चुकीचे- छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 20:59 IST

महाराष्ट्रात सातत्याने छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत चुकीची विधाने केली जात आहेत.

पिंपरी: पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी शाई फेकण्याची घटना घडली. या प्रकाराचे समर्थन करणार नाही. पण असं का कशामुळे घडले, याचाही विचार करायला हवा. महाराष्ट्रात सध्या सातत्याने छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत सातत्याने चुकीची विधाने केली जात आहेत. फुले, शाहू आंबेडकर यांच्यावर जो चिखलफेक, बदनामी करेन. त्यागोष्टीचा जो विरोध करेन तो आपला आहे. शाई फेकली म्हणून माणुस काय मरतो काय? आंदोलनकांवर खुनी हल्ला ३०७ कलम लावणे चुकीचे आहे, अशी टीका राष्टवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहर राष्टवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या विचार वेध प्रशिक्षणात भुजबळ बोलत होते. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, आझम पानसरे आदी उपस्थित होते.  भूजबळ म्हणाले,  ‘‘राज्यात राज्यपाल, लोढा, सुधाशु त्रिवेदी, चंद्रकांत पाटील अशा विविध नेत्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विरोधात काहीही बोलले जात आहे. हे लोक कशासाठी बोलताहेत. शिवरायांनी माफीपत्र दिले होते. तुम्हाला काय माहित. शिवरायांचा जन्म कुठे झाला. त्यांची कर्मभूमी कोणती हे ज्यांना माहित नाहीत. ते हिंदुत्ववादी म्हणून मिरवत आहेत. राष्टÑपुरूषांची बदनामी सुरू आहे. आंदोलन केले म्हणून खुन्नी हल्यांचा गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे.’’हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी  छगन भूजबळ यांनी हिंदु आणि हिंदुत्ववादी कोण कसे हे सांगताना, ‘‘शिवराय हे हिंदुच त्यांच्या राज्याभिषेकास विरोध करणारे हिंदुत्ववादी. तुकोबा हे हिंदुच, त्यांची गाथा बुडविणरे हिंदुत्ववादी.  संत ज्ञानेश्वर महाराज हे हिंदू, त्यांना वाळीत टाकणारे हिंदुत्ववादी, छत्रपती शाहू महाराज हिंदू. त्यांच्या मृत्यूनंतर जल्लोष करणारे हिंदुत्ववादी. महात्मा गांधी हे सनातनी हिंदू, त्यांना मारणारे हिंदुत्ववादी. असा नवीन हिंदुत्ववाद निर्माण होत आहे. ज्योतिबा फुले यांनी भीक मागितली, असे विधान न शोभणारे आहे.  ते समाजसुधारक आणि उद्योगपती होते. त्यांनी कधीही भिक मागितली नाही. महागाई, दरवाढ, बेरोजगारी विरोधात बोलले की इडी, सीबीआय लावली जाते.  ही दादागिरी सुरू आहे.  कारखाने खासगी उद्योग गुजरातला गेले. गावं कर्नाटकाला आणि मंत्री गुवाहटीला. हे खोके सरकार आहे,’’ अशी टीका केली.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळchandrakant patilचंद्रकांत पाटील