शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भयमुक्त स्थळनिर्मितीसाठी माहितीपट, अ‍ॅड. रमा सरोदे यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 03:51 IST

कामानिमित्त स्त्री घराबाहेर पडली असली, तरी तिला एका सुरक्षित स्थळी भयमुक्त आणि दबावरहित वातावरणात काम करण्याचा अधिकार आहे या विषयावर संवेदनशील, साधेपणाने पण ठामपणे विचार पोहोचविण्याची गरज आहे, या जाणिवेतून कार्यालय स्थळी स्त्रियांना सहन करावा लागणारा लैंगिक अत्याचार विविध उदाहरणांद्वारे छोट्या चित्रफितीतून दाखविण्यासाठी सामाजिक कायदेविषयक अभ्यासक अ‍ॅड. रमा सरोदे यांनी पुढाकार घेतला आहे.

पुणे -  कामानिमित्त स्त्री घराबाहेर पडली असली, तरी तिला एका सुरक्षित स्थळी भयमुक्त आणि दबावरहित वातावरणात काम करण्याचा अधिकार आहे या विषयावर संवेदनशील, साधेपणाने पण ठामपणे विचार पोहोचविण्याची गरज आहे, या जाणिवेतून कार्यालय स्थळी स्त्रियांना सहन करावा लागणारा लैंगिक अत्याचार विविध उदाहरणांद्वारे छोट्या चित्रफितीतून दाखविण्यासाठी सामाजिक कायदेविषयक अभ्यासक अ‍ॅड. रमा सरोदे यांनी पुढाकार घेतला आहे. कार्यालयीन स्थळी लिंगाधारित भेदभाव, विषमता नसावी हे सोप्या पद्धतीने सांगून स्त्री-पुरुषांना संवेदनशील करणारा माहितीपट निर्मित केला जाणार आहे.महिलांच्या छळाच्या प्रश्नासाठी दाद कुठे मागायची? कार्यालयात अंतर्गत समिती आहे का नाही? याबाबतही महिला अनभिज्ञ आहेत. त्यामुळे जागतिक महिला दिनी रमा सरोदे यांनी छोट्या चित्रफितींमधून व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी घेतलेला पुढाकार हे नक्कीच सकारात्मक पाऊल आहे. याविषयीची माहिती देणारा व्हिडिओहीत्यांनी सोशल मीडियावरही प्रसारित केला आहे.गेली १८ वर्षे मानवी हक्कांच्या विषयावर रमा सरोदे काम करीत आहेत. त्यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ. आज नोकरीनिमित्त स्त्रियांनी घराचा उंबरठा ओलांडला असला तरी कार्यालयीन स्थळी तिला सुरक्षित वातावरण मिळू शकलेले नाही.अत्यंत सोपी भाषा : व्हिडीओ बेस मॉड्यूल टेÑनिंग बनविणार१९९७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विशाखा समितीमार्फत मार्गदर्शक सूचनेनुसार कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळासंदर्भात निर्देश दिले होते. अनेक वर्षानंतर २०१३मध्ये कामाच्या ठिकाणी महिलांच्या छळासंदर्भातील कायदा अस्तित्वात आला.कायद्याअंतर्गत प्रत्येक कामाच्या ठिकाणी एक अंतर्गत समिती असावी जेणेकरून महिलांवर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होऊ नये आणि झाल्यास तत्काळ निवारण मिळवून देणे.यासाठी प्रतिबंधात्मक काम करण्यासाठी जनजागृती, प्रशिक्षण कार्यक्रम चालू आहेत; पण कुणाची वागणूक कुणासाठी लैंगिक छळ ठरेल, हे सांगतायेत नाही.या केस सांभाळताना कायद्याची जी समज आली, त्या कामाचे कुठेतरी डॉक्युमेंटेशन झाले पाहिजे. याकरिता अत्यंत सोप्या भाषेत कायद्याचे ज्ञान देत व्हिडीओ बेस मॉड्यूल टेÑनिंग मॉड्यूल आम्ही तयार करीत आहोत.कायद्याची भाषा क्लिष्ट न वाटता काय केस होतील आणि निवारण कसे केले, हा कायदा सोपा करून सांगण्यासाठी ही टेÑनिंग मॉड्यूल राज्यभरात पोहोचविणार आहोत.यासाठी मायग्रोथ झोन एज्युकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्हिडीओ करण्यासाठी सहकार्य करीत असल्याचे रमा सरोदे यांनी सांगितले.सामाजिक कायदेविषयक क्षेत्रात काम करताना आलेले विविध अनुभव स्त्री-पुरूष असा भेद मनात न ठेवता आणि पूर्वग्रहविरहित पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचविण्याची मोहीम कायद्याचा नेमका अर्थ सांगणाºया सहा व्हिडिओद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे. कार्यालयीन स्थळी स्त्रियांवर होणाºया लैंगिक हिंसाचारासंदर्भात नेहमी विचारल्या जाणाºया प्रश्नांची उत्तरे महत्त्वाचे व्यापक प्रबोधन साधू शकतील.- अ‍ॅड. रमा सरोदे,सामाजिक कायदा अभ्यासक

टॅग्स :WomenमहिलाWomen's Day 2018महिला दिन २०१८