शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

डाॅक्टरसाहेब, किडनी घ्या, पण दीड लाख रुपये द्या; शेतमजुराची अशीही विनवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 12:04 IST

कर्ज फेडण्यासाठी शेतमजुराची विनवणी

लाेकमत न्यूज नेटवर्क  पुणे : ‘डाॅक्टरसाहेब, माझ्या दाेन मुलींच्या लग्नासाठी काही वर्षांपूर्वी तीन ते चारजणांकडून कर्ज काढले हाेते. त्याबदल्यात एकाच्या शेतावर काम करताेय. त्यातील काही पैसे परत केले. आता काम हाेत नाही अन् मला त्यांचे व्याजाचे मिळून दीड लाख रुपये द्यायचेत. कृपया माझी किडनी घ्या; पण मला दीड लाख रुपये द्या,’ अशी विनवणी एका शेतमजुराने डाॅक्टरांकडे केली. सातारा येथून ससून रुग्णालयात आलेल्या या शेतमजुराने केलेल्या विनंतीनंतर डाॅक्टरही गाेंधळून गेले. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गव्हाणवाडी येथील भिका अडागळे (५६) हे रविवारी भल्या सकाळीच ससूनमधील अपघात विभागात आले हाेते. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या डाॅक्टरांना वाटले की, काही तपासणी करायची असेल. परंतु, तपासणीऐवजी त्यांनी डाॅक्टरांना ‘किडनी घ्या, पण दीड लाख रुपये द्या,’ अशी भलतीच मागणी केली. त्यामुळे डाॅक्टरही बुचकळ्यात पडले. 

डाॅक्टरांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. कायद्याने असे करता येत नाही, असे सांगितले. परंतु, अडागळे ऐकण्याच्या तयारीत नव्हते. शेवटी ससूनमधील वैद्यकीय समाजसेवा अधीक्षकांकडून त्यांचे समुपदेशन करण्याचे ठरले. अडागळे यांना दाेन मुली असून, त्यांची लग्ने झाली आहेत. स्वत:ची शेतजमीनही नाही. दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करून ते पाेट भरतात. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी त्यांनी दाेन्ही मुलींची लग्ने करण्यासाठी तीन ते चार सावकारांकडून लाख-दीड लाख रुपये व्याजाने घेतले हाेते. यापैकीच एका सावकाराच्या शेतावरच ते गेली २५ वर्षे महिन्याकाठी अवघ्या ७०० रुपयांवर काम करत आहेत, अशी माहिती अडागळे यांनी दिली.

आता काम हाेत नाही अन् सावकारांचा त्रासही सहन हाेत नाही. त्यामुळे किडनी देण्यास मी तयार आहे. यानंतर मी जगलाे काय अन् मेलाे काय, काही फरक पडत नाही. - भिका अडागळे, गव्हाणवाडी, पाटण, सातारा

अशी परिस्थिती निर्माण करायची की किमान वेतन न देता त्याची इच्छा असली तरी ताे कामावरून साेडून जाऊ शकत नाही, या प्रकारालाही वेठबिगारी म्हणतात. हे सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. अशा प्रकरणात जिल्हाधिकारी वेठबिगारी कायद्याखाली मजुराची सुटका करून त्याला भरपाई मिळवून देऊ शकतात.- नितीन पवार, कामगार नेते

 

टॅग्स :doctorडॉक्टरFarmerशेतकरी