शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:51 IST

बारामतीच्या सुरक्षिततेसंदर्भात बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, "दादांच्या नंतर सर्वांमध्ये संभ्रम आहे की, आता आमचे कसे होणार? पण दादा असताना सुरक्षिततेसंदर्भात बारामतीची जी ओळख निर्माण झाली आहे, ती तशीच कायम राहील याची खात्री बाळगा."

माझ्यासाठी केवळ पार्थ आणि जय हेच माझे कुटुंब नाही, तर संपूर्ण बारामती माझे कुटुंब आहे आणि प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सद्सय आहे. या कुटुंबाच्या विकासासाठी मी आयुष्यभर झटत राहील, हा माझा शब्त आहे. दादांच्या अचानक जाण्याने अनेक कार्यकर्त्यांचे मनोबल खचले. पण काळजी करू नका. एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. दादांचा जनता दरबार यापुढेही तसाच सुरू राहील. लोकांची कामे पूर्ण होणे हीच दादांना खरी श्रद्धांजली आहे, असा शब्द आणि विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. त्या बारामती येथे विधानसभा पोट निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी आयोजित पक्षाच्या मेळ्याव्यात बोलत होत्या. 

गुंडगिरी, खंडणी, बेकायदेशीर प्रकाराला कदापी थारा मिळणार नाही -बारामतीच्या सुरक्षिततेसंदर्भात बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, "दादांच्या नंतर सर्वांमध्ये संभ्रम आहे की, आता आमचे कसे होणार? पण दादा असताना सुरक्षिततेसंदर्भात बारामतीची जी ओळख निर्माण झाली आहे, ती तशीच कायम राहील याची खात्री बाळगा." एवढेच नाही तर, "शहरात गुंडगिरी, खंडणी, बेकायदेशीर प्रकाराला कदापी थारा मिळणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या जातील. त्यामुळे आपण सर्वांनी कसल्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नाही. असा विश्वासही सुनेत्रा पवार यांनी यावेळी बारामतीकरांना दिला.

अजित दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही -"पवार साहेबांनी बारामतीला विकासाचा दृष्टिकोण दिला आणि अजित दातांनी त्यात रंग भरले आणि जागतिक दर्जाकडे नेले. आपल्या बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही, असे वचन मी बारामतीकरांना देते. बारामती तालुकाहा जगातील सर्वात विकसित आणि सर्वात प्रगत तालुका बनवणे हे दादांचे स्वप्न नव्हते तर एक ध्यास होता. त्यांना बारामती हे जागतिक दर्जाचं शहर बनवायचं होतं. मात्र त्यांना नियतिने आपल्यातून नेले. दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे. मात्र, त्यांचा विकासाचा विचार पुढे नेण्याचा निर्धार मात्र मी केला आहे. ते शब्दाला जागणारे होते. त्यांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. त्यांना साक्षिला ठेऊनच मी तुम्हाला हे वचन देते," असेही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar assures support, continues 'Dada's Janta Darbar' for workers.

Web Summary : Sunetra Pawar pledged to support Baramati's workers after Ajit Dada's passing. She promised to continue his public outreach, prioritize law, order, and fulfill his development vision for Baramati.
टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणBaramatiबारामती