शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्गणीच्या नावाखाली खंडणी घेऊ नका, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 01:08 IST

यंदाच्या गणेशोत्सवामध्ये विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न करावा

इंदापूर : यंदाच्या गणेशोत्सवामध्ये विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न करावा, नागरिकांनी स्वच्छेने दिलेली वर्गणी स्वीकारावी व दुकानदार, व्यापारी, पथारीवाले यांना दमदाटी करून वर्गणी मागितल्याची तक्रार आल्यास मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांच्यावर खंडणीची गुन्हे दाखल करण्याचा इशारा बारामती विभागाचे अतिरीक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी दिला आहे.इंदापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत शहरातील शांतता कमिटीची बैठक व श्री गणराया अवार्ड २०१७ चे पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पखाले बोलत होते. यावेळी तहसिलदार सोनाली मेटकरी, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक मधुकर पवार, पोलीस उपनिरीक्षक अजित जाधव, सुशील लोंढे आदी सामाजिक कार्यकर्ते व मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नारायण शिरगावकर म्हणाले की, कायद्याने वर्गणी मागण्याचा अधिकार केवळ निबंधकांकडे नोंदणी असलेल्या मंडळांना आहे.गणेशत्सवाची मिरवणूक काढताना गुलाल मुक्त, फटाके मुक्त, डिजेमुक्त मिरवणूक काढण्यात यावेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार साठ डेसिबल पेक्षा जास्त आवाजाचे उल्लंघन केल्यास त्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी मंडळांनी आपले स्वयंसेवकांची गणेशमूर्तींना सुरक्षा द्यावी.शिरगावकर पुढे म्हणाले, अनेक गुन्हेगारांची यादी तयार केली त्यांनी जर नव्याने काही गुन्हा केला तर त्या गुन्हेगारांना लवकरच तडीपारचा आदेश काढण्यात येणार असून, उत्सवा दरम्यान सामाजिक सलोखा राखण्याचे चांगले काम करणाऱ्या मंडळांना श्री गणराय अवार्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.यावेळी मागील वर्षी २०१७ साली स्पर्धा उत्कृष्ट काम करणा-या मंडळांना श्री गणराय पुरस्कारदेण्यात आला. त्यामध्ये प्रथम क्रमांक श्रीमंत शिवराय प्रतिष्ठाण, द्वितीय क्रमांक संत सावतामाळी मित्र मंडळ, तृतीय क्रमांक विभागून राधिका मित्र मंडळ व नृसिंह गणेशोत्सव मंडळ, उत्तेजनार्थ नेहरू मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ , छत्रपती शिवाजी मित्र मंडळ यांना सन्मानचिन्ह व वृक्ष देवून गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस अधिकारी विनोद पवार यांनी प्रयत्न केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिताप, रमेश शिंदे, डॉ. महेश निंबाळकर, अय्याज शेख, महमित्र शिवराज परमार यांनी मनोगत व्यक्त केले व याच वर्षी मोहरम व गणेशोत्सव एकत्रित आल्याने इंदापूर शेख मोहल्ल्यातील नवजवान मित्र मंडळ हे सामाजिक सलोखा जपण्यासाठी मोहरम आणि गणेशोत्सव एकत्रित करणार आहेत.>मंडळांनी आपले स्वयंसेवक तयार करावेतप्रत्येक मंडळांनी आपल्या मंडळातील कार्यकर्ते घेवून कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी मंडळातील कार्यकर्ते यांना एक विशेष पोशाख देवून तयार करावे त्याने कायद्याचे उल्लंघन होणार नाही व पोलीस प्रशासनाला देखील मदत होईल- नारायण शिरगावकर,उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती

टॅग्स :MONEYपैसा