पुणे : पासधारक प्रवाशांना आरक्षित शयनयान डब्ब्यातून प्रवास करण्यास मनाई आहे. मात्र, तरीही अनेक पासधारक या डब्ब्यातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता पासवरच याची नियमाची आठवण करून देणारा शिक्का मारण्यास सुरूवात केली आहे. रेल्वेकडून विविध गाड्यांसाठी ठराविक दिवसांचे पास प्रवाशांना दिले जातात. या पासधारकांना ठरवून दिलेल्या डब्ब्यातच बसणे बंधनकारक असते. मात्र, अनेक प्रवासी शयनयान डब्ब्यांमध्ये जागा पाहून तिथे बसतात. विविध गाड्यांमध्ये असे प्रकार होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यानुसार आता प्रशासनाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या पासवरच याबाबतची आठवण करून देणारे शिक्के मारण्यास सुरूवात केली आहे. आरक्षित शयनयान डब्ब्यामधून प्रवास करण्यास सीझन तिकिटधारकांना अनुमती नाही, असे त्यावर नमुद केले जात आहे. दरम्यान, शिक्के मारून या प्रकाराला आळा बसणार नाही. अनेकदा रेल्वे कर्मचारी पैसे घेऊन नियमांची मोडतोड करतात. अशा कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याची आवश्यकता असल्याचे रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले.
आरक्षित डब्ब्यात बसु नका, विद्यार्थ्यांच्या पासवरच आता येणार शिक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:46 IST
आता प्रशासनाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या पासवरच याबाबतची आठवण करून देणारे शिक्के मारण्यास सुरूवात केली आहे.
आरक्षित डब्ब्यात बसु नका, विद्यार्थ्यांच्या पासवरच आता येणार शिक्का
ठळक मुद्देशयनयान डब्ब्यामधून प्रवास करण्यास सीझन तिकिटधारकांना अनुमती नाही.