शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाचा टेकू नको, घामाला दाम द्या; कांदा उत्पादकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 23:57 IST

प्रतवारीनुसार सरासरी ३ रुपयांपर्यंत दर : उत्पादनखर्चही निघेना

बारामती : राज्य शासनाने कांद्याला जाहीर केलेल्या प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदानाबाबत कांदा उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आम्हाला अनुदानाचा टेकू नको, तर घामाला दाम द्या, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. दिवसेंदिवस घसरत चालेल्या दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. आधीच दुष्काळाशी दोन हात करून वाढवलेले पीक मातीमोल किमतीत व्यापाऱ्याच्या हवाली करण्याची वेळ शेतकºयावर आली. त्यामुळे हवालदिल होत शेतकºयांनी कांदा फुकट वाटला.

राज्यभर कांदा उत्पादकांची थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. कांदा फुकट वाटलेल्या शेतकºयांनी दानपेटीत जमा झालेली रक्कम पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीमध्ये पाठवून एकप्रकारे शेतकºयांप्रति असलेल्या असंवेदनशीलतेला चपराक लगावली होती. यावर राज्य शासनाने कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदानाची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कांद्यासाठी होणारा उत्पादन खर्च, निघणारे उत्पन्न, मिळणारा बाजारभाव आणि शेवटी शेतकºयाच्या हातात येणारा नफा यामध्ये मोठी तफावत आहे. सध्या हळवी कांदा बाजारात विक्रीसाठी येत आहे. या कांद्याला प्रतवारीनुसार सरासरी ३ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. एकरी कांद्याचे उत्पादन ७ ते ८ टनापर्यंत निघते. जमिनीच्या प्रतवारीनुसार यामध्ये थोड्याफार प्रमाणात फरक पडू शकतो. रोपे तयार करण्यापासून ते कांदा वाळवून बाजारात विकण्यापर्यंत चार महिन्यांचा कालावधी पार पडतो. या कालावधीत शेतकºयाचे कांदा उत्पादनावर एकरी ४० ते ४५ हजार रुपये खर्च होतो. सध्याच्या बाजारभावानुसार २१ ते २५ हजारापर्यंत उत्पन्न मिळते. त्यात शासनाचे २०० रुपयाचे अनुदान जमा केल्यास १४ हजाराची वाढ होऊ शकते. तरीही उत्पादन खर्चाचा आकडा पार होत नाही, असे वास्तव आहे. त्यामुळे ‘आम्हाला नको सुट-सबसिडी, हवा घामाला दाम’ अशी मागणी कांदा उत्पादक शेतकºयांमधून होऊ लागलीआहे.कांदा उत्पादक शेतकºयाला अनुदान देऊन शासन फक्त शेतकºयांचे अश्रू पुसण्याचे नाटक करीत आहे. जाहिरातबाजीसाठी असे निर्णय घेतले जातात. मात्र आम्हाला अनुदान नको, तर आमच्या कांद्याला सरसकट १५ रुपये हमीभाव हवा आहे. व्यापारी जर कांदा या भावाने घेत नसतील तर राज्य शासनाने १५ रु. हमीभावाने कांदा खरेदी करावा तरच कांदा उत्पादक शेतकºयांना न्याय मिळेल.- दिनेश काळे, कांदा उत्पादक शेतकरी, जैनकवाडीराज्य शासन व केंद्र सरकार शेतकºयांची थट्टा करीत आहे. बाहेरच्या देशातून कांदा आयात करून येथील शेतकºयांच्या कांद्याचे भाव पाडले जात आहेत. कांद्याचे भाव पडले की येथील प्रक्रिया उद्योग मातीमोल किमतीत हाच कांदा खरेदी करतात. मुळात कांद्याचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये केलेला समावेशच व्यवहार्य नाही. कांदा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट केल्यानेच बाहेरून येणाºया कांद्यावर कोणत्याही प्रकारचे आयात शुल्क आकारले जात नाही. अनुदान दिल्याने हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी ठोस निर्णयांची गरज आहे. बाहेरील देशातून भारतात निर्यात होणाºया कांद्यावर जर कर आकारणी केली तरच येथील कांदा उत्पादकाला चांगला दर मिळेल. मात्र शासन केवळ उद्योगधार्जिणे निर्णय घेत आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांना येथील शेतमाल स्वस्तात मिळत आहे.- पांडुरंग रायते, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती