शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नाटक स्वरूपात चित्रपट मांडू नये, सुबोध भावे यांचा निर्मात्यांना कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 04:02 IST

साहित्यासोबतच मराठी नाटकांवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाली; परंतु नाटकाचे चित्रपटात रूपांतर करताना, नाटकाच्या कथेचे चित्रपटात रूपांतर करणे अपेक्षित असते. नाटकात जे दाखवले गेले तेच चित्रपटात पाहायला मिळेल, अशा समजुतीमध्ये प्रेक्षक चित्रपट पाहायला येत असतील तर मराठी प्रेक्षकांमध्ये ही चुकीची संकल्पना रुजली आहे. निर्मात्यांनी देखील नाटकच चित्रपट स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करू नये, असा कानमंत्र अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे यांनी निर्मात्यांना दिला.

पुणे - साहित्यासोबतच मराठी नाटकांवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाली; परंतु नाटकाचे चित्रपटात रूपांतर करताना, नाटकाच्या कथेचे चित्रपटात रूपांतर करणे अपेक्षित असते. नाटकात जे दाखवले गेले तेच चित्रपटात पाहायला मिळेल, अशा समजुतीमध्ये प्रेक्षक चित्रपट पाहायला येत असतील तर मराठी प्रेक्षकांमध्ये ही चुकीची संकल्पना रुजली आहे. निर्मात्यांनी देखील नाटकच चित्रपट स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करू नये, असा कानमंत्र अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे यांनी निर्मात्यांना दिला.संवाद पुणे आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणे यांच्यातर्फे आयोजित ‘संवाद मराठी चित्रपटांचा’ या मराठी चित्रपट संमेलनानिमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित दोन दिवसीय ‘ऋणानुबंध’ या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम; तसेच संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, राजू कावरे, वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार उपस्थित होते. भावे म्हणाले की, नाटक हे माध्यम वेगळे आहे आणि चित्रपट हे वेगळे माध्यम आहे. नाटकाचे चित्रपटात रूपांतर करताना त्या चित्रपट दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला त्या नाटकाच्या चित्रपटाच्या दृष्टिकोनातून नक्की कोणता दुसरा आयाम दिसतो आणि तो आयाम तो कसा मांडतो हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले, तर निकिता मोघे यांनी आभार मानले.मराठी चित्रपट महोत्सवांनीमहाराष्ट्राच्या सीमा ओलांडाव्यातमहाराष्ट्राबाहेर गुजरात, मध्य प्रदेश अशा विविध राज्यात आणि शहरांतदेखील मराठी लोकांची संख्या खूप आहे. एवढेच नव्हे, तर भारताबाहेर देखील विविध देशांमध्ये मराठी भाषिकांचा टक्का वाढत आहे. अशा परिस्थितीत चित्रपट महोत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून छोट्या-मोठ्या स्वरूपात चित्रपट महोत्सवांचे आयोजन केले जावे, अशी अपेक्षा सुबोध भावे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :marathiमराठीcinemaसिनेमाSubodh Bhaveसुबोध भावे