शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी चहा विकल्याचे भांडवल करू नये, शरद पवारही भाजी विकायचे ते संरक्षण मंत्री झाले : संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 14:25 IST

मोदी यांनी चहा विकल्याचे भांडवल करू नये, शरद पवारही भाजी विकायचे ते सरंक्षण मंत्री झाले, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली.

ठळक मुद्देशरद पवारही भाजी विकायचे ते सरंक्षण मंत्री झाले : संजय राऊत'राहुल गांधी आता २०१४ सारखे राहिलेले नसून त्यांच्यात अधिक परिपक्वता, आक्रमकता'

पुणे : नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचे भांडवल करू नये, शरद पवारही भाजी विकायचे ते सरंक्षण मंत्री झाले, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली.शिवसेनेची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी त्यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली. या वेळी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, शहर प्रमुख महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित होते.पुढे ते म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता २०१४ सारखे राहिलेले नसून त्यांच्यात अधिक परिपक्वता, आक्रमकता आली आहे. त्यांचे नेतृत्व पाहता ते नेता वाटतात. दुसरीकडे भाजपा सरकार जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत असून सरकारने ३ हजार कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. अशाप्रकारे जाहिरातींवर पैसा खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. स्वातंत्र्यनंतर २३ वर्षांनी वडनगर येथे रेल्वे आली असेल आणि पंतप्रधान सांगतात वयाच्या २०व्या वर्षानंतर देशसेवा करण्यास सुरुवात केली. या वरून त्यांनी चहा विकला का?, असा सवालही त्यांनी केला. नाना पटोले यांच्या भाजपा खासदारकीच्या राजीनाम्यावर ते म्हणाले, की नाना पटोले यांनी बाहेर पडणे हे विदर्भाची ठिणगी आहे. हा एक उद्रेक असून त्यांनी शेतकऱ्यांची भूमिका मांडली आहे. त्यावेळी चॅनेलवर येताच लोक  चॅनेल बदलत असत, मात्र आता लोक त्यांची भाषणे पाहत आहेत. भाजपा खासदाराच्या या भूमिकेतून त्यांच्या पक्षात काय चालले आहे, हे दिसत आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतNeelam gorheनीलम गो-हेSharad Pawarशरद पवार