शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीरपणे मंदीर बांधू नये, सर्वांनीच थाेडे सबुरीने घ्यावे ; रामदास अाठवलेंचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 19:05 IST

राम मंदीराबाबत येत्या जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून हा निकाल हिंदू व मुस्लिम या दोन्ही बांधवांना न्याय देणारा असेल.त्यामुळे बेकायदेशीरपणे मंदीर बांधू नये,सर्वांनीच थोडे सबूरीने घ्यावे. असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पुणे : राम मंदीराबाबत येत्या जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून हा निकाल हिंदू व मुस्लिम या दोन्ही बांधवांना न्याय देणारा असेल.त्यामुळे बेकायदेशीरपणे मंदीर बांधू नये,सर्वांनीच थोडे सबुरीने घ्यावे.तसेच मंदीर बांधण्यासाठी केंद्र शासनावर आॅर्डिन्स काढण्याबाबत दबाव आणू नये,भारतीय जनता पक्षाने मुस्लिम समाजाच्या भावनांचा विचार करावा,असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी केले.

    आरपीआयच्या वतीने आयोजित केल्या जाणा-या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.यावेळी आरपीआयचे शहर अध्यक्ष मिलिंद कांबळे,पुण्याचे उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे आदी उपस्थित होते. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आयोध्या दौराबाबत बोलताना आठवले म्हणाले,भारतीय जनता पक्षाची मुस्लिम आघाडी असून अनेक मुस्लिम बांधव शिवसेनेच्या पाठीशी आहे.त्यामुळे दोंंन्ही पक्षांनी राम मंदीर बांधण्याबाबत कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी. मुस्लिम समाजावर दबाव आणून राम मंदीर बांधू नये. तसेच आयोध्येत राम मंदीर,मशीद आणि बौध्द विहारासाठी सुध्दा जागा उपलब्ध करून द्यावी.सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून मी स्वत: आयोध्येला जाणार आहे.तसेच आयोध्येमधील हिंदू व मुस्लिम समाज बांधवांशी संवाद साधून यावर सामोपचाराने मार्ग काढण्याबाबत चर्चा करणार आहे.मशीदीच्या जागेवर एखादी शैक्षणिक संस्था सुरू करता येईल का? याबाबत संवाद साधणार आहे.आयोध्येतील वादग्रस्त जागा सोडून बौध्द विहारासाठी सुध्दा इतर ठिकाणी जमीन उपलब्ध करून द्यावी,या बाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे,असेही आठवले म्हणाले.         आरपीआयतर्फे आयोजित केल्या जाणा-या विदर्भ मेळाव्याबाबत बोलताना आठवले म्हणाले,येत्या 20 जानेवारी रोजी नागपूर येथे विदर्भ मेळावा आयोजित केला आहे.त्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी केली जाणार असून भूमिहिनांना जंगलाच्या जमिनीचे वाटप करावे,अशी मागणी करणार आहे.तसेच येत्या 10 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे आरपीआयकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय