शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

घाबरू नका... पोलीस आहेत!

By admin | Updated: November 25, 2015 01:19 IST

भरवस्तीतील एक चौक...सायंकाळचे सहा वाजलेले... ढग दाटून आल्याने झालेला काळाकुट्ट अंधार..मुसळधार पाऊस...अशा वातावरणात एक धास्तावलेली तरुणी चार-पाच टारगट

हिनाकौसर खान, प्रज्ञा केळकर-सिंग, लक्ष्मण मोरे, पुणेभरवस्तीतील एक चौक...सायंकाळचे सहा वाजलेले... ढग दाटून आल्याने झालेला काळाकुट्ट अंधार..मुसळधार पाऊस...अशा वातावरणात एक धास्तावलेली तरुणी चार-पाच टारगट मुलांनी छेड काढल्याने आणि अश्लील इशारे केल्याने घाबरलेली ‘ती’ १०९१ क्रमांकावर महिला मदत कक्षाला फोन करून मदतीची मागणी करते...पोलीस मदतीला येणार की नाहीत, आता काय करायचे, अशा विवंचनेत असतानाच अवघ्या १०-१५ मिनिटांत एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचतो, आजूबाजूला चौकशी करतो, नियंत्रण कक्षाकडून मोबाईल क्रमांक मिळवून तरुणीशी संपर्क साधतो आणि आपुलकीने विचारपूस करीत तिला मदतीचे आश्वासन देतो.महिला अत्याचारविरोधी दिनानिमित्त ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’ मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचा हा दिलासादायक आणि सुखद अनुभव आला. ‘लोकमत प्रतिनिधी’ने १०९१ या मदत कक्ष क्रमांकावर फोन करून, काही मुले पाठलाग करीत असल्याचे आणि छेडछाड करीत असल्याचे कळविले. त्या वेळी कक्षाने तिचा मोबाईल क्रमांक घेतला आणि काही वेळातच मदत मिळेल, असे सांगितले. त्यानंतर १०-१५ मिनिटांच्या कालावधीत पोलीस कर्मचारी भर पावसात प्रतिनिधीच्या मदतीसाठी धावून आले. घटनास्थळी आल्यावर त्यांनी गस्त घातली, आजूबाजूंच्या दुकानांमध्ये मारामारी, भांडणांची एखादी घटना गेल्या काही वेळात घडली का, याबाबत विचारणा केली. एखादी तरुणी घाबरून आजूबाजूला उभी आहे का, याचीही पाहणी केली. शहानिशा झाल्यावर, त्यांनी नियंत्रण कक्षाकडून तरुणीचा संपर्क क्रमांक घेऊन तिला फोन केला. तिची भेट घेतल्यानंतर त्याने तिला, ‘घाबरू नको, आम्ही मदतीसाठी आलो आहोत’ असे सांगत दिलासा दिला. मुले कधीपासून पाठलाग करीत आहेत, कशा प्रकारे बोलतात, हावभाव करतात, ओळखीचे आहेत की अनोळखी, गाडीवरून येतात की चालत, अशी सर्व तपशीलवार माहिती घेतली. उद्या मी किंवा माझा सहकारी या वेळेत तुमच्या मागून येऊन त्या मुलांना समज देऊ, गरज वाटल्यास तक्रार दाखल करू, असे सांगत स्वत:चा मोबाईल क्रमांकही दिला. या घटनेने पोलिसांमधील तत्परतेचे आणि त्याचबरोबर संवेदनशीलतेचे दर्शन घडविले. एरवी समाजाची पोलिसांबाबतची मानसिकता नकारात्मक असते. देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत असताना पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत आणि उदासीनतेने पाहत आहेत, असा आरोप केला जातो; मात्र ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये आलेल्या अनुभवाने या समजाला फाटा दिला. सर्व पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी एकाच मानसिकतेचे नसतात, जनतेच्या मदतीला धावून जाण्याचे कर्तव्य ते चोखपणे पार पाडतात, याबाबत हा अनुभव आला. छेडछाडीची घटना घडल्यानंतर, आजूबाजूचे लोक केवळ बघ्याची भूमिका घेत मदतीचा हात पुढे करीत नसल्याची खंत पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. सिव्हिल ड्रेसमध्ये जाण्यापेक्षा गणवेश घालून गेल्याने परिस्थिती जास्त लवकर नियंत्रणात येते, असेही त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय महिला अत्याचारविरोधी दिनसंयुक्त राष्ट्रसंघातर्फे दर वर्षी २५ नोव्हेंबर हा स्त्रियांच्या विरोधातील, स्त्रीसंदर्भातील हिंसा नष्ट करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस मानला जातो. स्त्रियांना घरी मारहाण होते, रस्त्यांवर छेडछाडीचा सामना करावा लागतो. जागतिक स्तरावर ३ पैकी १ महिलेला आयुष्यात कधी ना कधी शारीरिक किंवा लैंगिक हिंसा सहन करावी लागते. स्त्रियांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालणे आणि उपाययोजना अवलंबणे, हा या दिनामागील हेतू आहे.