शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

डीएसके यांचा जामीन अर्ज फेटाळला : कोठडीतील मुक्काम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 16:17 IST

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक कुलकर्णी (डीएसके) व त्यांच्या पत्नी हेमंती याचा जामिनाचा अर्ज विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने अनेकदा मुदत देवूनही ठरलेले रक्कम देवू न शकल्याने डीएसके दांम्पत्याला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत अटक केली होती.

ठळक मुद्देडीएस कुलकर्णींच्या अडचणीत वाढ : जमीनाचा अर्ज फेटाळला डीएसके यांच्यासह पत्नी हेमंती कुलकर्णी यांचाही कोठडीतील मुक्काम वाढला

पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक कुलकर्णी (डीएसके) व त्यांच्या पत्नी हेमंती याचा जामिनाचा अर्ज विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे डीएसकेंचा कोठडीत मुक्काम आता आणखी वाढणार आहे.  डीएसके यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. श्रीकांत शिवदे यांनी युक्तीवाद केला. त्यावेळी सरकारी पक्षाने आपले म्हणणे मांडण्यासाठी दोन दिवसांची वेळी मागीतली होती. त्यानुसार गुरुवारी सरकारी पक्षाचे वतीने अ‍ॅड. प्रदीप चव्हाण यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून  घेतले असून त्यावर आज (शुक्रवारी) आपला निर्णय दिला. 

      बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. श्रीकांत शिवदे यांनी डीएसके यांच्या वतीने बाजू मांडताना त्यांना जामीन देण्याची मागणी केली. डिएसके यांच्यावर दाखल असलेल्या एकाही गुन्ह्यात सहा वर्षांपेक्षा जास्त शिक्षा नाही. त्यामुळे त्यांच्यावर ४०९ कलम लावण्यात आला. दोषारोपत्र वेळेत न आल्याने ४०९ चा गुन्हा लागत नाही, असे वाटत असेल तर न्यायालयाने त्यांना जामीन द्यावा. डिएसके यांनी आत्तापर्यंत ठेविदारांचे १० हजार कोटी रुपये परत केले आहे. डीएसके यांच्याकडे आत्ता पैसे नसले तरी त्यांचे प्रोजेक्ट पुर्ण करण्यासाठी अनेक पार्टी भागीदारी करण्यासाठी तयार आहेत. मात्र आत्ताच्या वातावरणामुळे ते गुंतवणुक करण्यासाठी घाबरत आहे. तसेच त्यांनी गुंतवणूक करू नये यासाठी देखील काही गट सक्रीय आहे. डीएसके यांनी यापुर्वी देखील अनेक जणांच्या रक्कमा परत केल्या आहेत. उर्वरीत ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळण्यासाठी आणि डीएसके यांच्या वयाचा व त्यांना असलेल्या आजाराचा विचार करून त्यांना ६ महिने जामीन देण्यात यावा. या काळात ते त्यांनी काही रक्कम परत केली नाही तर जामीन रद्द करावा, असा युक्तीवाद अ‍ॅड. श्रीकांत शिवदे यांनी केला.  

    दरम्यान  डीएसके यांच्याकडे ६ हजार ६७१ ठेविदारांनी ४४८ कोटी ७१ लाखांच्या ठेवी ठेवलेल्या आहेत. तर त्यांना ४१६ व्यक्ती व संस्थांनी कर्ज दिले असून त्याची रक्कम १२२ कोटी ३८ लाखांच्या घरात आहे. न्यायालयाने वेळोवेळी मुदत देवूनही डीएसके ५० कोटी रुपये जमा करू शकले नाही. तसेच त्यांनी वेळोवेळी न्यायालयाची दिशाभूल केली. असा व्यक्ती जर जामिनावर सुटला तर ते काहीही करू शकता. तसेच त्यांची पळून जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.डीएसके यांनी वेगवेगळया कंपन्या स्थापन करताना त्या पब्लिक प्रा.लि. नावाने उभारल्या असून त्याद्वारे भागधारकांकडून पैशांची उभारणी केली आहे. त्यामुळे डीएसके कंपन्याचे खरे मालक नसून ते केवळ विश्वस्त असल्याने त्यांनी कंपनी फायद्याचे दृष्टीने निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, पदाचा गैरवापर करत त्यांनी भागधारकांचा पैसा व्यैक्तिक कारणाकरिता तसेच स्वत:चे आर्थिक फायद्याकरिता वापरला आहे, असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. प्रविण चव्हाण यांनी केला.  

काय आहे प्रकारण ?

 न्यायालयाने अनेकदा मुदत देवूनही ठरलेले रक्कम देवू न शकल्याने डीएसके दांम्पत्याला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत अटक केली होती. त्यांनतर त्यांना शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. १५ मार्चनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अटक केलेल्या दिवशीच रात्री कोठडीत पडून जखमी झालेल्या डीएसके यांना ससून  व त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात हलविण्यात आले होते. तब्येत सुधारल्यानंतर त्यांना पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. या काळात त्यांची १५ वाहने जप्त करण्यात आली होती.  

 

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीCourtन्यायालय