पुणे : दिव्यांग व्यक्तींचा वावर सहज व्हावा यासाठी अपंग कल्याण आयुक्तालयात उभारण्यात आलेल्या सुविधा कुलुपबंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्वच्छतागृहापासून ते वाहनतळाचा वापरही दिव्यांगांना सहजतेने करता येत नाही. पोलीस आयुक्तालयाजवळ राज्याचे अपंग कल्याण आयुक्तालय आहे. दिव्यांगांना सोयी सुविधा देणे, राज्यातील सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगाना अडथळामुक्त वातावरण आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी अपंग कल्याण आयुक्तालयाकडे आहे. एसटी स्टँड, विविध सरकारी कार्यालयांमध्ये अस्थिव्यंग, अंध, मुके, बहिरे अशा विविध प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींचा वावर सहज व्हावा यासाठी रॅम्प, सुयोग्य स्वच्छतागृह, योग्य उंचीवरील पाणपोई, ब्रेल लिपीतील सूचना फलक अशा विविध सोयी करणे आवश्यक आहे.
अपंग कल्याण आयुक्तालयातच दिव्यांगांच्या सुविधा कुलुपबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 19:33 IST
दिव्यांगांना सोयी सुविधा देणे, राज्यातील सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगाना अडथळामुक्त वातावरण आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी अपंग कल्याण आयुक्तालयाकडे आहे.
अपंग कल्याण आयुक्तालयातच दिव्यांगांच्या सुविधा कुलुपबंद
ठळक मुद्देस्वच्छतागृहालाही लागलेत टाळेस्वच्छतागृह, योग्य उंचीवरील पाणपोई, ब्रेल लिपीतील सूचना फलक अशा विविध सोयी आवश्यक