शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘डायव्हर्शन’ बनले मृत्यूचा सापळा, पुणे-सोलापूर महामार्गावर भादलवाडी बनले अपघाताचे केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 01:04 IST

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ‘डायव्हर्शन पॉर्इंट’ मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बिल्ट कंपनीपासून ते डाळजपर्यंत रस्ता दुरुस्तीसाठी वाहतुकीचे डायव्हर्शन करण्यात आले आहे.

पवळसदेव - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ‘डायव्हर्शन पॉर्इंट’ मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बिल्ट कंपनीपासून ते डाळजपर्यंत रस्ता दुरुस्तीसाठी वाहतुकीचे डायव्हर्शन करण्यात आले आहे. भादलवाडी येथेही डाळज बाजूकडून येणाऱ्या वाहनांना डायव्हर्शन दिले आहे. मात्र भरधाव वेग अन् चुकीचा रस्ता यामुळे अपघात होऊन एक जण ठार व एक जण जखमी झाला आहे.रात्री आठ वाजता हा अपघात झाला. मोहम्मद अलीम नबी हसन शहा (वय ३५, सध्या रा. लोणी देवकर, ता. इंदापूर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. बहारण सय्यद अन्सारी (वय ४५, रा. सदर) जखमी झाले आहेत. भिगवण बाजूकडून हे दोघे इंदापूर बाजूकडे जात होते. बुधवारी रात्री भादलवाडी येथे डायव्हर्शनच्या ठिकाणी अंदाज न आल्याने त्यांची मोटारसायकल डायव्हर्शनला धडकली.यामध्ये एक ठार, तर एक जण जखमी झाला आहे. अपघाताची भीषणता इतकी तीव्र होती, की मृत्यू झालेल्याचा मेंदू बाहेर पडला होता. त्यामुळे महामार्गावरील ठिगळे बुजविणयाचे काम कधी संपणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक लोकांना याची कल्पना असते. मात्र इतर वाहनचालकांना याची कल्पना नसल्याने वाहने सुसाट वेगाने धावत असतात. परिणामी अपघात होऊन जीव जातो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी याकामी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा अपघातांची मालिका अशीच सुरू राहील.नारायणगावात साइडपट्टीसाठी मोठे दगड; वाहनांचे अपघातनारायणगाव : पुणे-नाशिक महामार्ग क्र. ६० वरील नारायणगाव शहरात सुरू असलेल्या रस्तारुंदीकरणात ठेकेदाराने साइडपट्टीसाठी मोठे दगड टाकून ठेवल्याने अनेक दुचाकी वाहनांचे अपघात झाले आहेत. या साइडपट्ट्यांचे त्वरित डांबरीकरण करण्यात यावे; अन्यथा होणाऱ्या अपघातांना जबाबदार धरून संबंधित ठेकेदार व सबठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव (अण्णा) खैरे यांनी दिला आहे.बाह्यवळणाचे काम रेंगाळल्याने खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खास बाब म्हणून नारायणगाव येथील ५ कि.मी.रस्त्यासाठी २२ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतला होता. या कामाचे टेंडर १७ कोटी रुपयांस दिलेले आहे. निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना नारायणगाव ग्रामस्थ व व्यापारी यांनी आंदोलन केले होते. त्या वेळी ठेकेदार संतोष घोलप यांनी रस्त्याचे काम दर्जात्मक करण्याची ग्वाही देऊन हे काम त्वरित पूर्ण करू, असे जाहीर केले होते; तसेच रस्त्याच्या साइडपट्ट्याची ४५० एमएम खोदाई व त्यामध्ये २०० जीएसबी मटेरियल टाकण्यात येईल. त्यानंतर २५० डब्यु एमएम इतका वरचा मिक्स मटेरियलचा थर राहील. तसेच ५० एमएमचे डांबरीकरण व नंतर बी.सी.मटेरियल राहील. सध्या मूळचा रस्ता ३.५ मीटरचा व १.५ मीटर साइडपट्टी असा आहे. नव्याने ५ मीटरचे डांबरीकरण त्यामध्ये ३ मीटर ते ६ मीटर व्हेरिश्न व २ मीटरचे डेज्नेज तसेच ज्याठिकाणी वाढीव रस्ता आहे त्याठिकाणी रस्तारुंदीकरण करण्यात येईल. खराब पट्टी काढून नव्याने टाकण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. यानंतर आंदोलकांनी संयम ठेवल्यानंतर ठेकेदाराकडून संथगतीने काम सुरू आहे. नारायणगाव बसस्थानक ते शिवाजीराव खैरे कॉर्नरपर्यंत साइडपट्टीकरिता मोठ मोठी खडी टाकलेली आहे. या खडीमुळे अनेक दुचाकी वाहनांचे अपघात होऊन वाहन चालक जखमी झालेले आहेत. दररोजच वाहने घसरून अपघात होत असल्याने या बाबतची माहिती ठेकेदारास दिल्यानंतरही साइडपट्टीचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. यामुळे व्यापारीवर्ग त्रस्त झालेला असून वाहनचालकही वारंवार होणाºया अपघातांमुळे संतप्त झाले आहेत. ठेकेदाराने साइडपट्ट्यांचे त्वरित डांबरीकरण करावे; अन्यथा संबंधित ठेकेदारास होणाºया अपघाताला जबाबदार धरून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा खैरे यांनी दिला आहे.

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षा