शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

जिल्हास्तरीय बॅडमिंटन : आदिती, तारा, केदार यांना तिहेरी मुकुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 04:37 IST

तारा शहा, आदिती काळे, केदार भिडे यांनी आपापल्या वयोगटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आयोजित अमनोरा करंडक बॅडमिंटन स्पर्धेत तिहेरी मुकुट मिळविला.

पुणे : तारा शहा, आदिती काळे, केदार भिडे यांनी आपापल्या वयोगटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आयोजित अमनोरा करंडक बॅडमिंटन स्पर्धेत तिहेरी मुकुट मिळविला.पीवायसी जिमखाना येथे झालेल्या या स्पर्धेत या स्पर्धेत तारा शहाने १५, १७ व १९ वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद जिंकले. तारा शहा निखील कानेटकर बॅडमिंटन अ‍ॅकॅडमीमध्ये सराव करीत असून विद्या व्हॅली स्कूलमध्ये सातवीत शिकत आहे. तिने पहिल्यांदाच तिहेरी मुकुट मिळवला. दुसरीकडे आदिती काळेने महिला एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीत जेतेपद आपल्या नावावर केले. याचबरोबर केदार भिडेने १७ वर्षांखालील एकेरी व दुहेरीत व १९ वर्षांखालील दुहेरीतील विजेतेपद आपल्या नावावर केले.स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नाट्य-सिनेअभिनेते प्रशांत दामले, पीवायसीचे अध्यक्ष विजय भावे, अमनोराचे संचालक आदित्य देशपांडे यांच्या हस्ते पार पडला.तारा शहाला वार्षिक शिष्यवृत्तीया वेळी संघटनेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारी ५० हजार रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती तारा शहाला अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते देण्यात आली.या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंचा मान मुलांमध्ये केदार भिडेला वर मुलींमध्ये आदिती काळेला देण्यात आला.निकाल सर्व अंतिममुले : १७ वर्षांखालील : एकेरी : केदार भिडे, वि. वि. प्रतीक धर्माधिकारी २१-१७, २१-१४; दुहेरी : केदार भिडे/ पार्थ सुधांशु वि. वि. सस्मित पाटील/ व्यंकटेश अगरवाल २१-११, २१-१५.१९ वर्षांखालील दुहेरी : केदार भिडे/ पार्थ घुबे वि. वि. आर्य देवधर/ सोहम नावंदर २१-१९, २१-१८, मुली : १९ वर्षांखालील : एकेरी : तारा शहा वि. वि. जान्हवी कानेटकर २१-१७, १०-२१, २१-१४; १७ वर्षांखालील : तारा शहा वि. वि. जान्हवी कानेटकर २१-१९, २२-२०; १५ वर्षांखालील : तारा शहा वि. वि. रिया हब्बू २१-१२,२१-१७; महिला : दुहेरी : आदिती काळे /रिया जाईल वि. वि. दीप्ती सरदेसाई/ नूपुर गाडगीळ २१-१०, २१-१३; मिश्र दुहेरी : ऋतुराज देशपांडे/आदिती काळे वि. वि. चैतन्य सालपे/ मानसी गाडगीळ १५-२१, २१-११, २१-१०; महिला : एकेरी : आदिती काळे वि. वि. चारुता वैद्य ९-२१, २१-१८,२१-१२. 

टॅग्स :Sportsक्रीडा