शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु होणार: हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 23:11 IST

प्राथमिक शिक्षकांची ३० जूननंतर जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु होणार..

बारामती : राज्यातील प्राथमिक शिक्षकांची ३० जूननंतर जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु करणार असल्याची माहिती ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (कै. शिवाजीराव पाटील गट ) राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बदली पोर्टल सुरु करण्याबाबत मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली.

बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी अधिक माहिती देताना सांगितले की,  राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या आॅनलाईन पद्धतीने करणेसाठी शासनाने दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी बदलीचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. त्यासंदभार्तील सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. 

बदली धोरणानुसार जिल्हा अंतर्गत बदल्या ३१ मे पर्यंत होणे बंधनकारक आहे. परंतु यावर्षी कोरोना संसगार्मुळे ३० जून पर्यंत कोणत्याही प्रकारच्या बदल्या करू नयेत ,असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे स्वतालुक्यात येऊ इच्छिणाऱ्या अनेक शिक्षकांची गैरसोय व निराशा झाली होती.परंतु आज रोजी कोरोना प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झालेली आहे.याच पार्श्वभूमीवर शिक्षक बदली पोर्टल सुरु करून प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुरु करावी.

बदलीसाठीची सेवेची अंतिम तारीख ३१ मे ऐवजी ३० जून करावी, संवर्ग ४ मध्ये समाविष्ट शिक्षकांना एका शाळेवर ३ वर्षे सेवा पूर्ण झाली असल्यास विनंती बदलीसाठी पात्र समजण्यात यावे. यासंदर्भात शासनाने लवकरात लवकर शुद्धीपत्रक काढावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (कै.शिवाजीराव पाटील गट) यांच्यावतीने करण्यात आली.याबाबत  लवकरच शुद्धीपत्रक काढू असे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.———बदलीसाठी धरावयाच्या सेवेची अंतिम तारीख ३१ मे ऐवजी ३० जून केल्यास २०१८ व १९ मध्ये विस्थापित होऊन पर तालुक्यात बदलून गेलेल्या शिक्षकांना स्व तालुक्यात येण्यासाठी लाभदायी ठरेल.एका शाळेवर तीन वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्वच संवर्गातील शिक्षकांना विनंती बदलीची संधी मिळावी.

- केशवराव जाधव, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.

टॅग्स :BaramatiबारामतीTeacherशिक्षकHasan Mushrifहसन मुश्रीफState Governmentराज्य सरकारTransferबदली