शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळेना फर्निचर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 04:33 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून कार्यालयासाठी आवश्यक फर्निचरचे कामच झाले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभाग आजही भाड्याच्या इमारतीत आहेत.

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून कार्यालयासाठी आवश्यक फर्निचरचे कामच झाले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभाग आजही भाड्याच्या इमारतीत आहेत. शासनाकडून गेल्या तीन-चार वर्षांपासून पुण्याला निधी देताना दुजाभाव होत असून, फर्निचरसाठीचा बांधकाम खात्याकडे जमा केलेला १ कोटी ३० लाखांचा निधी राज्यात अन्य कामांसाठी वळविण्यात आला. सध्या ठेकेदारांकडून इमारतीत सुमारे ७ कोटी रुपयांचे फर्निचरचे काम करण्यात आले असून, हा पैसा दिला नाही तर पुढील काम थांबविण्याचा इशारा ठेकेदाराने दिला आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सातत्याने नव्या इमारतीच्या उर्वरित कामासाठी आणि फर्निचरच्या कामांसाठी निधी मिळण्याबाबत पाठपुरावा केला होता. इमारतीचे उद्घाटन होणे आवश्यक असल्याने इमारतीच्या कामांसाठी निधी देण्यात आला आणि फर्निचरच्या कामांसाठी डिसेंबर २०१७ मध्ये पुरवणी अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते. हे आश्वासन मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित ठेकेदाराला मार्च २०१८ पर्यंत कामाची आगाऊ रक्कम देण्यात येईल, असे सांगून फर्निचरच्या कामाचे आदेश देण्यात आले होते.पैसे न मिळल्यास काम थांबवण्याचा इशारा ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी दिली.अन्य ठिकाणी निधी वळविलाजिल्हाधिकारी कार्यालयाच्या ए आणि बी अशा दोन्ही विंगमधील पाचही मजल्यांवर ठिकठिकाणी खुर्च्या, टेबल, कपाटे आणून ठेवण्यात आली आहेत. तसेच ए विंगमधील पाचव्या मजल्यावर जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहाचे कामही जलदगतीने सुरू होते.शासनाने फर्निचरच्या कामासाठी मार्चअखेरला बांधकाम विभागाच्या खात्यात १ कोटी ३० लाख रुपये सकाळी जमा करण्यात आले. परंतु काही तासांतच राज्यातील अन्य ठिकाणच्या विकासकामांसाठी निधी कमी पडत असल्याची सबब पुढे हा निधी काढून घेण्यात आला. यामुळे गेल्या काही दिवसांपासून येथील फर्निचरचे काम रखडले आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या